आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्‍तर कोरियाकडून पुन्हा क्षेपणास्त्र चाचणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेऊल - उत्तर कोरियाने अमेरिकेच्या निर्बंधाकडे दुर्लक्ष करत पुन्हा बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली. प्योंगयांग येथे शुक्रवारी पहाटे ही चाचणी घेण्यात आली. क्षेपणास्त्र ८०० किमी अंतरावर समुद्रात जाऊन पडले. त्याची मारक क्षमता जपानपर्यंत आहे.

जपानने उत्तर कोरियाची ही कृती चिथावणीखोर असल्याचे म्हटले आहे. दक्षिण कोरियाच्या म्हणण्यानुसार, दुसऱ्या क्षेपणास्त्राचेही प्रक्षेपण करण्यात आले आहे. १७ किमी अंतरावर गेल्यानंतर ते रडारवरून बेपत्ता झाले. त्याला दुजोरा मिळू शकला नाही. उ. कोरियाने गेल्या आठवड्यात कमी अंतराच्या दोन क्षेपणास्त्रांची चाचणी केली होती. त्यांचे नेते किम जोंग उन यांनी अण्वस्त्रांची आणखी चाचणी करण्याचे निर्देश दिले होते. दक्षिण कोरियाच्या लष्करप्रमुखांनी म्हटले की, चाचणी संयुक्त राष्ट्र आणि अमेरिकेच्या निर्बंध फेटाळण्यासाठी करण्यात आली आहे. दक्षिण कोरियाच्या योनहाय वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, क्षेपणास्त्र मध्यम पल्ल्याचे रोडोंग असू शकते. एप्रिल २०१४ नंतर उ. कोरियाची ही मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी आहे.