आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॉकेट इंजिनाची उत्तर कोरियाकडून चाचणी; जगाला धडकी, क्षेपणास्त्रांची मर्यादा वॉशिंग्टनपर्यंत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेऊल - उत्तर कोरियाने आंतरखंडीय क्षेपणास्त्रे आणि अणुचाचण्यांनंतर पुन्हा एकदा जगाला विशेषत: दक्षिण कोरियास (सेऊल) धडकी भरवली. पुन्हा अणुचाचणीची अपेक्षा असताना हेकेखोर आणि कुणालाच न जुमानण्याच्या मन:स्थितीत असलेल्या उ. कोरियाने आपल्या उच्च क्षमतेच्या नव्या रॉकेटच्या इंजिनची यशस्वी चाचणी घेतली, अशी माहिती द. कोरियाचे सरकारी माध्यम मूव्ह सेऊलने मंगळवारी दिली.

ते पुढे म्हणतात, याचा आराखडा पाहता त्याची क्षमता अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील शहरे त्याचे लक्ष्य होऊ शकतात एवढी वेगवान प्रगती उ. कोरियाच्या उच्च क्षमतेच्या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाने केली आहे. पुन्हा एकदा अमेरिकेसह जगाला घाबरवून टाकणारा कार्यक्रम उ. कोरियाने आखला असून दोन आठवड्यांनंतर यशस्वी झालेली ही रॉकेट इंजिनची जमिनीवरील चाचणी लवकरच म्हणजे दोन आठवड्यांनंतर होणारच आहे, असे प्यांगाँगने म्हटले आहे. खरे म्हणजे ही चाचणी एका लघु अणुबॉम्ब चाचणीप्रमाणेच असेल. गेल्या दोन चाचण्यांमधून आत्मविश्वास दुणावलेल्या एकाकी, जगाशी फटकून वागणारा उत्तर कोरिया आपल्या लक्ष्याकडे इंचाइंचाने प्रगती करत आहे. या आंतरखंडीय क्षेपणास्त्रांवर अणुबॉम्ब ठेवून आता उ. कोरिया आपले लक्ष्य साधू शकतो. वॉशिंग्टनलाही लक्ष्य करण्याची क्षमता उत्तर कोरियाने प्राप्त केली आहे. उपग्रह उड्डाणस्थळावर किम जाँग उन यांनी शास्त्रज्ञांना काही आदेशही दिले.
त्याचबरोबर तंत्रज्ञ यांनी २४ तास कार्यकुशल राहून क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम लवकरात लवकर पूर्ण करावा. त्यांनी या प्रगतीवर समाधान व्यक्त केले, अशी माहिती केसीएनए यांनी दिली.
छायाचित्र: चाचणीच्या वेळी उपस्थित किम जोन्ग ऊन.
बातम्या आणखी आहेत...