आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर कोरियाने केली रॉकेट चाचणी, अमेरिकेला बेचिराख करू - उत्तर कोरिया

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेऊल - उत्तर कोरियाने शनिवारी देशी बनावटीच्या रॉकेट इंजिनची यशस्वी चाचणी घेतली. आता आम्ही अमेरिकेवर अणुहल्ला करून देशाला बेचिराख करण्यास सक्षम बनलो आहोत, अशा शब्दांत कोरियाने अमेरिकेला धमकीही देऊन टाकली. त्यावर अशा प्रकारची चाचणी घेणे गैर आहे. ते टाळण्याचा प्रयत्न करा, असा इशारा अमेरिकेने दिला आहे.
उत्तर कोरियाने इंजिनाच्या यशस्वी चाचणीचा दावा केला आहे. दाव्यात तथ्य असल्यास ही बाब अत्यंत गंभीर आहे. कारण अण्वस्त्र कार्यक्रमातील हे मोठे यश आहे, असे संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांना वाटते. या वर्षाच्या सुरुवातीला उत्तर कोरियाने चौथे आण्विक चाचणी घेतली होती. परंतु अमेरिकेच्या मुख्य भूमीपर्यंत हल्ला करण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी देशाला आणखी परिश्रम घ्यावे लागणार आहेत. नवीन चाचणीची माहिती उत्तर कोरियाच्या सरकारी वृत्तसंस्थेने दिली. उत्तर कोरियाचे प्रमुख किम जाँग उन यांच्या देखरेखीखाली आंतरखंडीय देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राच्या (आयसीबीएम) नवी प्रकारातील इंजिनाची यशस्वी चाचणी घेण्यात आली. ही चाचणी देशाच्या पश्चिमेकडील किनारपट्टीवर करण्यात आली. याबरोबरच अमेरिकेसह अनेक देश उत्तर कोरियाच्या टप्प्यात आले आहेत, असा दावा करण्यात आला आहे.

‘प्रदेशात अशांतता निर्माण हाेण्याची भीती’
उत्तरकोरियाकडून सातत्याने अशा प्रकारची कृती केली जात आहे. त्यांनी चाचणी घेणे बंद केले पाहिजे. त्यामुळे कोरियन प्रदेशात अशांतता निर्माण होऊ शकते. या अगोदर उत्तर कोरियाने अमेरिकेवर हल्ल्याची धमकी दिली होती. त्याचबरोबर पारंपरिक शत्रू दक्षिण कोरियालाही धमकी देण्यात आली आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यातील संयुक्त लष्करी सरावाला उत्तर कोरियाने आक्षेप घेतला आहे. त्याशिवाय संयुक्त राष्ट्राकडून लावण्यात आलेल्या निर्बंधालाही देशाने विरोध दर्शवला आहे.