आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उ.कोरियाची बॉम्बनिर्मिती सुरू, अमेरिकेला इशारा, द.कोरिया करेल महाशक्तींशी चर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेऊल - कोरिया द्वीपकल्पात सोमवारी पुन्हा तणाव वाढला. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी आपला देश अमेरिकेशी सामना करण्यासाठी बॉम्बनिर्मिती सुरू ठेवेल, अशी घोषणा केली आहे.

उन म्हणाले, अमेरिका उत्तर कोरियाची शासन व्यवस्था उद््ध्वस्त करू इच्छित आहे. आम्ही त्यांना तसे करू देणार नाहीत. याआधी रविवारी अमेरिकी विमानांनी दक्षिण कोरियाच्या सीमेजवळ उड्डाणे करून शक्तिप्रदर्शन केले. दक्षिण कोरियाही उत्तर कोरियाच्या हायड्रोजन चाचणीमुळे चरकला आहे.

सोमवारी त्यांनी आपले आण्विक संवादक महाशक्तींना भेटणार असल्याचे सांगितले. बुधवारी ते अमेरिका आणि जपानच्या संवादकांची भेट घेतील. गुरुवारी चीनच्या संवादकांना भेटणार आहेत. या चर्चेनंतर उत्तर कोरियाच्या अणुबॉम्बचा सामना करण्याच्या पर्यायावर विचार केला जाईल. पाश्चिमात्य देश आणि संयुक्त राष्ट्राने हायड्रोजन बॉम्ब चाचणीमुळे उत्तर कोरियावर कडक आर्थिक निर्बंध लागू करण्याची घोषणा केली. अमेरिकेने दक्षिण कोरियामध्ये तैनात आपल्या लष्कराला सतर्क राहण्यास सांगितले आहे. इथे अमेरिकेचे जवळपास ३०,००० सैनिक आहेत. रविवारी त्यांनी बी- ५२ बॉम्बवर्षावक, दक्षिण कोरियाच्या एफ १५ लढाऊ विमानांसह दोन्ही कोरियांच्या सीमेवर उड्डाणे केली. ही विमाने ७० किमी अंतरावर ओसान हवाई तळावर तैनात आहेत.
उत्तर कोरियाकडून ध्वनिक्षेपकाचा वापर
दक्षिण कोरियाने उत्तर कोरियाविरुद्ध ध्वनिक्षेपकावर प्रसार सुरू केला आहे. उत्तर कोरिया ही कृती नेहमी युद्धसदृश्य ठरवतो. या वेळी उत्तर कोरियानेही यासाठी ध्वनिक्षेपकाचा वापर केला. दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते किम मिनसियोक यांनी सांगितले की, उत्तर कोरिया संगीताच्या माध्यमातून किम जोंग उन यांचे कौतुक करत आहे. यासोबत दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष पार्क गुन यांच्यावर टीका केली जात आहे.