आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेच्या ब्लॅकमेलिंगला घाबरणार नाही : उ. कोरिया

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्योंगयांग- अमेरिकेच्या अणू ब्लॅकमेलिंगला अजिबात घाबरणार नाही, असा पवित्रा उत्तर कोरियाने घेतला आहे. उत्तर कोरियाने दोनच दिवसांपूर्वी यशस्वी अणूचाचणी घेतली होती. त्यावर अमेरिकेने त्यांना दम दिला होता.

उत्तर कोरियातील सत्ताधारी पक्षाचे मुखपत्र असलेल्या रोडोंग सिनमुन या वर्तमानपत्रानुसार, अमेरिकेच्या अणूदबावाचा काळ संपला आहे. अणूचाचणी विरोधात दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती पार्क ग्यून हे यांच्या प्रतिक्रियेवरही यात टीका केली आहे. अशा प्रतिक्रिया आणि इशाऱ्याला उत्तर कोरिया घाबरत नाही, असेही यात म्हटले आहे. या अणूचाचणीवर संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने म्हटले की, या प्रकरणी त्यांच्यावर लवकरच कारवाई केली जाईल. अमेरिका, ब्रिटन फ्रान्सने उत्तर कोरियावर निर्बंध टाकण्याची अपिल सुरक्षा परिषदेकडे केली होती.
बातम्या आणखी आहेत...