आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • North Korea Threatens To Leave No Americans Alive On War Anniversary

नॉर्थ कोरियाची अमेरिकेला धमकी- युद्ध झाले तर एकही अमेरिकन जिवंत ठेवणार नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुमसुसान पॅलेसमध्ये किम जोंग-इल यांच्या पुतळ्यापुढे श्रद्धांजली वाहाताना किम जोंग. - Divya Marathi
कुमसुसान पॅलेसमध्ये किम जोंग-इल यांच्या पुतळ्यापुढे श्रद्धांजली वाहाताना किम जोंग.
सियोल - कोरियाच्या द्विपकल्पावर कुठेही युद्ध झाले तर एकाही अमेरिकनला जिवंत ठेवणार नाही, असा इशारा नॉर्थ कोरियाच्या टॉप लिडर्सने अमेरिकेला दिला आहे. रविवारी नॉर्थ कोरियाने 'कोरियन वॉर'चा 62वा वर्धापन दिन साजरा केला. यावेळी नॉर्थ कोरियाच्या नेत्यांनी अमेरिकेला धमकावले. कोरियन वॉरच्या स्मृतित राजधानी प्योंगयांग आणि इतर शहरांमध्ये झेंडे आणि बॅनर्स लावण्यात आले होते.
किम जोंग उनने दिली अमेरिकेला धमकी
देशातील आण्विक शक्तीचा उल्लेख करुन किम म्हणाले, 'आण्विक शस्त्रांचा धाक दाखवून अमेरिकेने आम्हाला धमकावण्याचे दिवस आता संपले आहेत. आता अमेरिकेत ताकद उरलेली नाही. आता त्यांच्यासाठी आम्ही धोकादायक झालो आहोत.' कोरियन सेंट्रल न्यूज वृत्तसंस्थेनूसार, किम जोंग रविवारी रात्री कुमसुसान पॅलेसमध्ये गेले. तिथे त्यांचे वडील किम जोंग-इल आणि आजोबा किम-इल-संग यांचे पार्थिव शरीर सुरक्षित ठेवण्यात आलेले आहे.
संरक्षणमंत्री म्हणाले, कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यासाठीही कोणी शिल्लक राहाणार नाही
कोरियन पीपल्स आर्मीचे प्रमुख आणि संरक्षण मंत्री जनरल पाक योंग-सिक म्हणाले, 'अमेरिका आमच्याविरोधात योजना तयार करत आहे आणि आम्हाला चिथावणी देण्याची एकही संधी सोडत नाही.मात्र आता आपण शक्तीशाली देश झालो आहोत. आता युद्ध झाले तर, सरेंडर डॉक्यूमेंटवर स्वाक्षरी करण्यासाठी एकही अमेरिकन शिल्लक राहाणार नाही.' पाक योंग म्हणाले, 'गेल्या साठ वर्षांपासून आपण शांत आहोत, मात्र अमेरिका शांत नाही. मागील कोरियन वॉरमध्ये अमेरिकेच्या पराभवाची सुरुवात झाली होती. मात्र आता दुसऱ्या युद्धात अमेरिका पूर्ण संपलेली असेस.'
तीन वर्षे सुरु होते युद्ध
कोरियन वॉर तीन वर्षांनंतर संपले होते. 27 जुलै 1953 रोजी करारावर स्वाक्षरी झाली होती. मात्र त्या दिवशी कोणत्याही शांतता करारावर स्वाक्षरी झाली नव्हती. मात्र, नॉर्थ कोरिया त्याला 'साम्राज्यवादी' अमेरिकेवर आपला विजय मानत आली आहे. अमेरिका या युद्धात संयुक्त राष्ट्राच्या सहकारी देशाच्या वतीने दक्षिण कोरियाकडून लढला होता. नॉर्थ कोरिया दरवर्षी हा दिवस विजयदिन म्हणून साजरा करत आले आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, 'कोरियन वॉर'चा 62वा वर्धापन दिन