Home »International »Other Country» North Koreas Kim Jong Un Says US Threats Make Nuclear War Imminent

आण्विक युद्ध पेटणारच, फक्त वेळ ठरवायची आहे! किम जोंगची अमेरिका, दक्षिण कोरियाला धमकी

दिव्य मराठी वेब टीम | Dec 08, 2017, 12:56 PM IST

इंटरनॅशनल डेस्क -अमेरिका आणि दक्षिण कोरियाने संयुक्त युद्ध सराव सुरू करताच उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन भडकला आहे. किम जोंग उनच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिका आणि दक्षिण कोरियाला तत्काळ संयुक्त युद्ध सराव बंद करण्यास सांगितले. एवढेच नव्हे, तर आण्विक युद्धाची धमकी सुद्धा दिली आहे. उत्तर कोरियाची अधिकृत वृत्तसंस्था केसीएनएने दिलेल्या वृत्तानुसार, युद्ध अटळ असून केवळ ते कधी होणार याची वेळ ठरवणे बाकी असल्याचे सुद्धा परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे. 


आमच्या सुप्रीम लीडरची कुप्रसिद्धी करतेय अमेरिका
> केसीएनएच्या वृत्तानुसार, उत्तर कोरिया नव्हे तर अमेरिकेच्याच काही अधिकाऱ्यांना युद्ध हवे आहे. जगाने तिसरे महायुद्ध पाहावे अशी त्या अमेरिकन अधिकाऱ्यांची इच्छा आहे. 
> गेल्या आठड्यातच अमेरिकेचे सीआयए प्रमुख माइक पॉम्पियो यांनी उत्तर कोरियाच्या हुकूमशहाला खडसावले होते. किम जोंग उन आपल्या देशात मोठ्या संकटात आणतो याची त्याला जाणीव देखील नाही. 
> उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने अशा प्रकारचे वक्तव्य आपल्या सुप्रीम लीडरचा अपमान असल्याचे म्हटले. यासोबतच, सुप्रीम लीडरवर टीका करून अमेरिकेने समस्त उत्तर कोरियाच्या जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. असा दावाही परराष्ट्र मंत्रालयाने केला. 
> यासोबत अमेरिकेने आमची कुप्रसिद्धी सुरू केली असून उत्तर कोरियाच्या संयमाचा गैरफायदा घेतला जात आहे. असेही सांगण्यात आले आहे. 

 

सीमेवरच संयुक्त युद्ध सराव
उत्तर कोरियाने लांब पल्ल्याचे मिसाइल टेस्ट घेतल्याच्या 6 दिवसानंतर अमेरिकेने दक्षिण कोरियासोबत संयुक्त युद्ध सराव सुरू केला. उत्तर कोरियाच्या सीमेजवळच सुरू झालेल्या या संयुक्त युद्ध सरावात अमेरिकेने आपल्या ताकदीचा नमुना दाखवला. तसेच नॉर्थ कोरियाच्या सीमेवर एक दोन नव्हे, तर तब्बल 230 लढाऊ विमान उतरवले. अमेरिकेचे 16 हजार सैनिक दक्षिण कोरियाचे 1 लाख सैनिक या सरावात सहभागी झाले आहेत.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या संयुक्त युद्ध सरावाचे फोटोज...

Next Article

Recommended