आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उत्तर कोरियाने बनवले शक्तिशाली क्षेपणास्त्र; 13 हजार किमीची मारक क्षमता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेऊल/वॉशिंग्टन- अमेरिकेच्या धमक्या आणि संयुक्त राष्ट्रांचे निर्बंध झुगारून देत उत्तर कोरियाने सप्टेंबरनंतर पुन्हा एकदा क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. उत्तर कोरियाने बुधवारी पहाटे लांब पल्ल्याच्या वसाँग-१५ या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. अमेरिकेत कुठेही मारा करणाऱ्या नव्य क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेऊन आमचा देश पूर्ण अणुशक्तीधारक देश झाला आहे, असा इशारा उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी दिला आहे.


दुसरीकडे, या चाचणीनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, उत्तर कोरियाचे आव्हान मोडून काढण्याची अमेरिकेची तयारी आहे. ट्रम्प म्हणाले की, या चाचणीनंतर अमेरिका उत्तर कोरियावर आणखी निर्बमध लादणार आहे. यासंदर्भात त्यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी चर्चाही केली आहे. 


उत्तर कोरियाच्या या क्षेपणास्त्र चाचणीनंतर संयुक्त राष्ट्रांनी सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक बोलावण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, दोन्ही कोरियाच्या भागातील स्थिती बिघडत आहे, असा इशारा दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे इन यांनी दिला आहे. जपनाचे पंतप्रधान शिंझो अॅबे म्हणाले की, उत्तर कोरियाची ही नवी क्षेपणास्त्र चाचणी म्हणजे हिंसक कृत्य आहे. ते सहन करता येऊ शकत नाही. 

 

वसाँग-१५ क्षेणास्त्राचे वैशिष्ट्य

 

>  ४,४७५ किमी उंचीवर पोहोचले

> ९५० किमी दूर चाचणी स्थळापासून जपानच्या विशेष आर्थिक क्षेत्रातील समुद्रात पडले क्षेपणास्त्र

बातम्या आणखी आहेत...