आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Novak Djokovic Have Received Offer Of 2 Lakh Dollars

टेनिसमध्ये फिक्सिंग : वर्ल्ड नंबर 1 जोकोविचला 2 लाख डॉलरची ऑफर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोवाक जोकोविच (फाइल फोटो) - Divya Marathi
नोवाक जोकोविच (फाइल फोटो)
लंडन - एका मीडियारिपोर्टनुसार टेनिसमध्ये गेल्या 10 वर्षांत फिक्सिंगची अनेक प्रकरणे समोर आली. पण कोणावरही कारवाई करण्यात आली नाही. दरम्यान आता टेनिसमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नोव्हाक जोकोविचने फिक्सिंगवर एकप्रकारे शिक्कामोर्तब केला आहे. फिक्सिंगसाठी त्याच्याशीही संपर्क करण्यात आला होता, असा दावा जोकोविचने केला आहे.

अशी मिळाली ऑफर...
- जोकोविकच्या मते करिअरच्या सुरुवातीलाच त्यालाही मॅच फिक्सिंगची ऑफर मिळाली होती. मीडिया रिपोर्टमधील दाव्यानुसार जोकोविचला मॅच फिक्सिंगसाठी 2 लाख डॉलर (सुमारे 1 कोटी 35 लाख) रुपये ऑफर करण्यात आले होते.
- जोकोविच म्हणाला, मला थेट संपर्क कण्यात आला नव्हता. 2007 मध्ये माझ्याबरोबर काम करणाऱ्यांच्या माध्यमातून माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
- गेल्या सहा किंवा सात वर्षांमध्ये मी कधीही फिक्सिंगबाबत ऐकले नाही. काही लोकांबाबत चर्चा होत असते. पण त्यांनाच यावर तोडगा काढायचा आहे. मी काही करू शकत नाही.
- या प्रकारामुळे मी काहीसी घाबरून गेलो होतो, कारण मला चुकीच्या प्रकरणांमध्ये अडकायचे नव्हते.
- काही लोकांना हा प्रकार पैसे कमावण्याची संधी वाटू शकते. पण मला हा गुन्हा वाटतो.

यांनी केला दावा...
- बीबीसी आणि बझफीडने रविवारी सायंकाळी मॅच फिक्सिंगशी संबंधित सिक्रेट फाइल्स पाहण्याचा दावा केला होता.
- दाव्यानुसार गेल्या 10 वर्षांमध्ये 50 टॉप रँकिंग प्लेयर्सपैकी सुमारे 16 जण फिक्सिंगमध्ये सहभागी असल्याचा दावा केला जातो.
- बीबीसीच्या मते या 16 प्लेयर्सनी अनेक ठिकाणी पैसे घेऊन पराभव स्वीकारला आहे. त्याची माहिती टेनिस इंटेग्रिटी युनिट (टीआईयू) लाही आहे.
- रिपोर्टनुसार आरोप करण्यात आलेले काही जण ग्रँडस्लॅम विजेतेही आहेत. पण त्यांच्यापैकी कोणालाही खेळण्यापासून अडवण्यात आले नाही.
- ग्रँड स्लॅममधील पहिली स्पर्धा ऑस्ट्रेलियन ओपन सोमवारपासून सुरू होत आहे. त्यामुळे या रिपोर्टची अधिक चर्चा आहे.