आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रान्सनंतर आता बेल्जियम, ऑस्ट्रेलियावर सायबर हल्ले, इस्लामिक कट्टरवाद्यांचे हॅकिंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रुसेल्स (सिडनी) - इस्लामिक स्टेट या कट्टरवादी संघटनेने सायबर हल्ल्यांचा सपाटा लावला आहे. नुकत्याच फ्रान्सच्या टीव्ही फाइव्ह मॉंदेवर सायबर हल्ला करून फ्रान्स सैन्याला धमकावण्यात आले होते. आता बेल्जियम माध्यमांना लक्ष्य करण्यात आले आहे.

येथील आघाडीचे वृत्तपत्र "ले सोइर'चे संकेतस्थळ हॅक केल्याचे समूहाचे प्रमुख दीदीर हामान्न यांनी ट्विटरवर जाहीर केले. मात्र, कोणी सायबर हल्ला केला हे निश्चित सांगता येणार नाही, असे ते म्हणाले. अमेरिकेच्या आयएसविरोधी कारवाईला बेल्जियमने पाठिंबा दिला आहे. संकेतस्थळ हॅक करण्याचे प्रकार यापूर्वीही घडले असून त्यावर लवकर उपाय योजणे शक्य झाले आहे. मात्र, या वेळी संपूर्ण यंत्रणाच कोलमडल्याचे हामान्न यांनी स्थानिक वृत्तवाहिनीने म्हटले आहे.

विमानतळाचे संकेतस्थळ हॅक
ऑस्ट्रेलियन विमानतळ प्रशासनाचे संकेतस्थळ इस्लामिक स्टेटने हॅक केले आहे. आम्ही आयएसचे समर्थक आहोत, असा संदेशही हॅकर्सनी पाठवला आहे. टास्मानिया येथील हॉबर्ट आंतरराष्ट्रीय विमानतळद्वारे वापरण्यात येणाऱ्या वेब होस्टला हॅकर्सनी लक्ष्य केले. हा हल्ला थेट नसून अप्रत्यक्षरीत्या करण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. स्थानिक जिहादी समर्थकांचे हे कृत्य असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. रविवारी सकाळपासून हे संकेतस्थळ ऑफलाइन आहे. इराक व सिरियामधील मित्रराष्ट्रांच्या आयएसविरोधी कारवायांना ऑस्ट्रेलियाने सातत्याने पाठिंबा दिला आहे.