आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Now Facebook, Instagrama, Twitter Become Is Nation: Modi

आता फेसबुक, इंस्टाग्राम,टि्वटर आमचे शेजारी राष्ट्र बनले आहे : मोदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सॅन जोन्स, कॅलीफोर्नीया- पंतप्रधान नरेंद्र मोदी सिलीकॉन व्हॅलीमध्ये पोहचले आहेत. सर्वात आधी त्यांनी टेस्ला कंपनीला भेट दिली.सीईओ अॅलन मस्क यांच्याबरोबर कॅम्पसमध्ये ते तासभर राहीले.पॉवर कंसेप्टवर चालणा ऱ्या बॅटरीच्या तंत्रज्ञानाची माहिती घेतली.त्यानंतर टि्वट केले की, बॅटरीमध्ये मोठ्या कालावधीसाठी उर्जा साठवून ठेवता येऊ शकते.ही शेतक ऱ्यांसाठी खूप फायद्याची ठरू शकते.त्यावर चर्चाही झाली. डीजीटल इंडीया कार्यक्रमादरम्यान अॅपलचे टीम कूक,मायक्रोसॉफ्टचे सत्य नडेला ,गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आदी दिग्गज उपस्थित होते.
मोदींनी पॉलिसीऐवजी फील गुडचे भाषण दिले
डिजिटल डीनरमध्ये सांगितले
- मी आपणाशी दिल्ली, न्यूयॉर्क, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर भेटलो आहे. फेसबुक, ट्विटर आमचे नवे शेजारी आहेत.
-फेसबुक एक देश असता तर सर्वांत जास्त लोकसंख्या असलेला तिसरा देश असता. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामने सर्वांना पत्रकार बनवले आहे.
- झोपणे आणि जागे राहणे यापेक्षा तुमचा स्टेटस महत्त्वाचा असतो की तुम्ही ऑनलाइन आहात की ऑफलाइन.
- हरियाणाच्या एका पित्याने मुलीसाठी सेल्फी विथ डॉटरसाठी पुढाकार घेतला तर ते विश्व आंदोलन बनले.
कामाची प्रेरणा घेण्यासाठी भारतात गेले होते
टीम कुक यांनी सांगितले की संस्थापक स्टीव्ह जॉब्स प्रेरणा मिळवण्यासाठी भारतामध्ये गेले होते. स्टीव्ह जॉब्स १९७४ मध्ये आध्यात्मिक ज्ञानाच्या शोधात आपल्या काही मित्रांसह भारतात नीम करौली बाबांना भेटण्यासाठी आले होते.
मोदींना भेटल्यानंतर अनेक टॉपटेक सीईओंनी दिले आश्वासने
ब्रँड अॅम्बेसेडर आहेत मोदी
सुरतमध्ये आम्ही डाटा अॅनालीटीक सिस्टीमवर काम करत आहोत.आम्ही पाच लाख गावांपर्यंत हे तंत्रज्ञान पोहोचवणार आहोत.आता वेळ आला आला आहे की,आम्ही जगभरातील लोकांना मजबूती द्यावी.
सत्य नडेला,सीईओ,मायक्रोसॉफ्ट

डिजीटल इंडियामुळे आनंदी
भारत दुसरे सर्वात मोठे टेलीकॉम मार्केट आहे.मेक इन इंडिया अंतर्गत भारतात अनेक डिझाईन सेंटर्स बनवू.१५० मिलीयन डॉलरची गुंतवणुक करू.जगासाठी उत्पादनांची निर्मीती करू.
पॉल जॅक्सन,प्रेसिडेंट,क्वॉलकॉम
भारत सृजनशिलतेची भूमी आहे
भारत सर्वात वेगाने विकास करीत आहे.३००० पेक्षा जास्त स्टार्टअप भारतात आहे.भारत सृजनशीलतेसाठी सुपीक जमीन आहे.मी या परिवर्तनाचा अनुभव घेतला आहे.
सुंदर पिचाई,सीईओ,गुगल
पीएम मोदी जग बदलतील
पीएम मोदी जग बदलवून टाकणार आहेत. ते ग्लोबल ट्रेंडस समजतात.डीजीटल इंडिया तशीच योजेना आहे. मोदी भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलवतील.
जॉन चेंबर्स,सीईओ,सिस्को

गुंतवणूक वा रोजगार नव्हे, केवळ सुविधा देतील कंपन्या
बी.बी.भट्टाचार्य,अर्थशास्त्री
जास्त चर्चा डीजीटल टेक्नॉलॉजी कंपन्यांबरोबरच झाली आहे. या कंपन्या भारतात जास्त गुंतवणुक करणार नाहीत.त्याने रोजगारही वाढणार नाही.परंतु, डीजीटल सुविधा वाढतील.ग्राहकांना याचा लाभ मिळेल.गावात ब्रॉडब्रॅंड टेक्नॉलॉजी पोहचणार आहे.डीजीटल बिझनेस करणा ऱ्या भारतीय कंपन्यांनाही याचा काही लाभ मिळणार आहे. विदेशी कंपन्या भारत किंवा मोदींना उत्तरदायी राहणार नाहीत.त्यांची प्रतिबद्धता त्यांच्या शेअर धारकांशी आहे.जेव्हा त्यांना वाटेल की भारतात गुंतवणुक करण्यात लाभ आहे तेव्हाच ते येथे पैसा गुंतवतील.जोपर्यंत येथील परिस्थीतीत बदलणार नाही तोपर्यंत ते गुंतवणुकीपासून दूर राहणार आहेत. परिस्थीती बदलण्यासाठी मोदींना आता राज्यांचा दौरा करण्याची गरज आहे.
भारतात समस्या योजनेच्या अंमलबजावणीवर आहेत.महागाई जागतिक कारणामुळे घटलेली असूनही एकाही मोठ्या कंपनीने मोठ्या गुंतवणुकीची घोषणा केलेली नाही. रोजगाराच्या बाबतीतही काही विशेष यश मिळालेले नाहीत.गुजरातला त्यांनी उद्योगांसाठी अनुकूल बनवले आहे.हीच अपेक्षा त्यांच्याकडून देशपातळीवर होती.आता त्यांना राज्यांमध्ये जाऊन पहावे लागेल की,रस्ते, वीज सारख्या मूलभूत सुविधा किती वाढल्या आहेत.अंतर्गंत परिस्थीती सुधारली तर विदेशी गुंतवणुकदार स्वताहुन येतील.त्यांना बोलावण्याची गरज भासणार नाही.