कॅलिफोर्निया -
फेसबुकने
आपल्या लॉगइन प्रक्रियेत महत्त्वाचे बदल करून वापरकर्त्यांना दिलासा दिला आहे. आता फेसबुक लॉगइनद्वारे एखाद्या अॅपमध्ये प्रवेश करताना युजरची माहिती संबंधित अॅपला कळू द्यावयाची की नाही, याचा निर्णय युजर घेऊ शकणार आहे.
फेसबुकच्या लाॅगइन एखाद्या ऍपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी संबंधित ऍपला युजरची फेसबुकवरील सर्व माहिती पाहता येत होती. आता ही माहिती सहजपणे पाहता येणार नाही. यापूर्वी फेसबुकवरून विविध ऍप्सकडे वळणा-या युजरला माहितीच्या सुरक्षिततेची चिंता होती. युजरची जन्मतारीख, इ-मेल, मित्रांची यादी, तसेच प्रोफाईलवरील अन्य माहिती संबंधित ऍप पाहू शकत होती. आता हा पर्याय युजर निवडू शकेल.