आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Now French Aircraft Carrier Will Getting Charge Of Attack On ISIS

फ्रान्सच्या एअरक्राफ्ट कॅरिअरने मोर्चा सांभाळला, ISIS च्या तळांवर हल्ले वाढवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्रान्सचे राफेल फायटर प्लेन. फ्रान्सने सिरिया आणि इराकमध्ये हवाई हल्ले कऱण्यासाठी आता एअरक्राफ्ट तैनात केले आहेत. - Divya Marathi
फ्रान्सचे राफेल फायटर प्लेन. फ्रान्सने सिरिया आणि इराकमध्ये हवाई हल्ले कऱण्यासाठी आता एअरक्राफ्ट तैनात केले आहेत.
पॅरिस - फ्रान्सने दहशतवादी संघटना ISIS च्या तळांवर हल्ले वाढवले आहेत. फ्रान्सने प्रथमच एअरक्राफ्ट कॅरिअर (Charles de Gaulle) चा वापर करत दहशतवादी ठिकाणांवर बॉम्ब हल्ले केले आहेत. सोमवारी सिरियाशिवाय इराकमध्येही दहशतवाद्यांना लक्ष्य केले आहे. फ्रान्सच्या लष्कराने एका ट्विटद्वारे याबाबत माहिती देताना म्हटले की, दोन तळे उध्वस्त करण्यात आली आहेत. पॅरिस हल्ल्यानंतर फ्रान्सने ISIS च्या विरोधात हल्ले वाढवणार असल्याचे म्हटले होते.
संरक्षण मंत्र्यांनी दिले होते संकेत
फ्रान्सचे संरक्षण मंत्री जेन यूवेस ले डरियन यांनी रविवारी हल्ले वाढवण्याचे संकेत दिले होते. त्यांनी युरोप 1 रेडिओशी बोलताना सांगितले होते की, ''आम्ही ईस्टर्न मेडिटेरियन समुद्रात मदतीसाठी एअरक्राफ्टला तैनात केले आहेत. ते सिरिया आणि इराकमध्ये हवाई हल्ले करायलाही मदत करेल. फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्सुआ ओलांद आणि ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हीड कॅमेरून यांच्यातही दहशतवादी संघटनेत्या विरोधात चर्चा झाली होती. त्यांनी एअरक्राफ्ट वापरावरही चर्चा केली होती, असेही सांगितले जात आहे.
फ्रान्सकडून असे केले जाताहेत हल्ले...
>जॉर्डन आणि यूएईहून फ्रान्सचे 12 फायटर जेट्स एकापाठोपाठ एक सिरियाकडे उड्डाण घेत आहेत. नुकत्याच केलेल्या हल्ल्यांत फ्रान्सने सिरियामध्ये किती बॉम्ब टाकले हे अद्याप निश्चित नाही. पण हल्ले मोठ्या प्रमाणावर केले जात आहे. फ्रान्स रक्कामध्ये रात्रीच्यावेळी हल्ले करत आहे.
>फ्रान्सच्या कारवाईत समोर आलेली एक चिंतेची बाब म्हणजे, रक्कामध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या जीवालाही आता धोका निर्माण झाला आहे. एका वृत्तसंस्थेनुसार सुरुवातीला रशिया आणि आता फ्रान्सच्या हवाई हल्ल्यांमुळे रक्कामध्ये लोकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. ISIS च्या विरोधातील युद्धात निरपराध लोकांचाही जीव जात आहे.
>फ्रान्सने न्यूक्लियर पॉवर्ड एअरक्राफ्ट कॅरियर जहाज Charles de Gaulle मेडिटेरियन समुद्रातून सिरियाकडे रवाना केले होते. या जहाजामध्ये अण्वस्त्रेही आहेत. त्यात 26 फायटर जेट्स एकाचवेळी पार्क करता येतात. ते सिरियाच्या जवळ पोहोचताच आता फ्रान्सकडे कारवाईसाठीच्या फायटर प्लेन्सची संख्या 38 झाली आहे. तारण या परिसरात त्यांचे आधीचे 12 फायटर प्लेन आहेत.
पॅरिसमध्ये एक्सप्लोसिव्ह बेल्टमुळे भितीचे वातावरण
दरम्यान, फ्रान्सची राजधावी पॅरिसच्या साऊथ सिटी मोट्रोंगमध्ये सोमवारी एका कचराकुंडीत एक्सप्लोसिव्ह बेल्ट आढळल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले. ज्याठिकाणी 13 नोव्हेंबरच्या पॅरिसमधील हल्ल्याचा मास्टरमाइंड सालाह अब्देसलामचा फोन आढळला होता, त्याचठिकाणी हा बेल्ट आढळला आहे. या बेल्टचा तपास केला जात आहे. 13 नोव्हेंबरला पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 132 लोक मारले गेले होते.