आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता गुगलवरुन ही मागवा आवडीचे खाद्यपदार्थ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सॅन फ्रान्सिस्को - गुगल आता तुमच्या आवडीचे खाद्य पदार्थ आणण्‍यासही तयार आहे. कंपनीने आपल्या गुगल सर्च ऑप्शनमध्‍ये फूड ऑर्डरचा नवा फीचर्स युजर्संना उपलब्ध करुन देणार आहे. या फीचरनुसार कोणताही युजर आपल्या आवडीनुसार खाद्य गुगलनुसार ऑर्डर करु शकतो.

गुगल फूड ऑर्डर फीचर असे कार्य करते
तुम्हाला गुगलमधून खाद्यपदार्थ मागायचे असेल, तर गुगल सर्चमध्‍ये आपल्या आवडीच्या डिशचे नाव टाकावे लागेल. नंतर गुगल आपल्या रिझल्टमध्‍ये ऑर्डर करण्‍यात आलेल्या खाद्यपदार्थ बनवणा-या जवळच्या हॉटेल्स आणि रेस्तरॉंची यादी दाखवते आणि तसेच त्यांच्या संकेतस्थळासमोर फूड ऑर्डर फीचर दाखवते. त्यावर क्लिक करताच तुम्हाला हवे असलेल्या खाद्य पदार्थांची ऑर्डर त्या संबंधित हॉटेल किंवा रेस्तरॉंमध्‍ये पोहोचवले जाते. यानंतर तत्काळ त्याचे कर्मचारी तुमची ऑर्डर पोहोचती करतात.
बातम्या आणखी आहेत...