आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एनएसजीमध्ये भारताच्या सदस्यत्वावर २४ ला चर्चा, चीन अडल्याने व्हिएन्नातील चर्चा निष्फळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हिएन्ना - अणु पुरवठादार समूहाचे (एनएसजी) सदस्य होण्यासाठी भारताने केलेल्या अर्जावरील व्हिएन्नातील बैठक निष्फळ ठरली. भारताच्या सर्वसंमत सदस्यत्वामध्ये अडथळा आणला जाऊ नये, अशी विनंती अमेरिकेने केली होती. परंतु चीनने आक्षेप घेतला. त्यामुळे २४ जून रोजी सेऊलमधील अधिवेशनात त्यावर विचार होण्याची शक्यता आहे.
व्हिएन्नात ४८ सदस्यीय देशांची बैठक झाली. बहुतांश सदस्य राष्ट्रांनी भारताच्या विनंतीला मान दिला. परंतु चीनने अर्जाला विरोध दर्शवला.

चीनच्या बाजूने कोण? तुर्की, न्यूझीलंड, आयर्लंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रिया.

चीनकडून भारताला आशा का होती? २००८ मध्ये भारत-अमेरिका नागरी अणु कराराच्या वेळी एनएसजीच्या सदस्यत्वाचे चीनने समर्थन केले होते. त्यामुळे भारताला चीनकडून अपेक्षा होती.
भारताचा दावा : एनएसजीच्या सदस्यत्वासाठी एनपीटीवर स्वाक्षरी अनिवार्य नाही. यासंदर्भात भारताने फ्रान्सचे उदाहरण दिले आहे.
बातम्या आणखी आहेत...