आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अणू युध्‍द झाल्यास भारतावर पाकिस्तान पडेल भारी, कोणाची किती ताकद?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
थर्मोन्युक्लियर इंटरकॉन्टिनेन्टल बॅलिस्टिक मिसाइल आरएस-24 यार्स - Divya Marathi
थर्मोन्युक्लियर इंटरकॉन्टिनेन्टल बॅलिस्टिक मिसाइल आरएस-24 यार्स
नऊ देशांजवळ सध्‍या 15 हजारांपेक्षा अधिक आण्विक शस्त्रे आहेत. आण्विक शस्त्रे नष्‍ट करण्‍याची मागणी होत असतानाही त्यांची संख्‍या वाढत आहे. चला जाणून घेऊ या कोणत्या देशाजवळ कोणते आण्विक शस्त्रे आहेत...
रशिया - 7 हजार 300
अमेरिका - 6 हजार 970
फ्रान्स - 300
चीन - 260
इंग्लंड - 215
पाकिस्तान - 130
भारत - 120
इस्रायल - 80
उत्तर कोरिया - 8
- शीत युध्‍दाच्या वेळी आण्विक शस्त्रे कमी करण्‍यासाठी सर्व बाजूंनी प्रयत्न केल्यानंतरही जागतिक पातळीवर संहारक शस्त्रांची संख्‍या वाढत आहे.
- 2016 च्या सुरुवातीला जगात संहारक शस्त्रांची संख्‍या 15 हजार 350 पर्यंत पोहोचली आहे.
- 10 हजारापेक्षा जास्त लष्‍करी ताफ्यात आहे. बाकी नष्‍ट केले जाणार आहे. यात 4 हजार 200 वॉरहेड्स ऑपरेशनल फोर्ससह तैनात आहे.
- अहवालानुसार, अमेरिका, रशिया, इंग्लंड आणि फ्रान्स या देशांकडे 1 हजार 800 संहारक शस्त्रांचा अल्पावधीत वापर केला जाऊ शकतो.
- अमेरिका, रशिया आणि इंग्लंड आपापल्या संहारकशस्त्रांमध्‍ये कपात करीत आहे. मात्र गेल्या 25 वर्षांच्या तुलनेत तिची गती कमी झाली आहे.
- या बाबत फ्रान्स-इस्रायल स्पर्धेत नाहीत. दुसरीकडे चीन, पाकिस्तान, भारत आणि उत्तर कोरिया वेगाने संहारक शस्त्रांची संख्‍या वाढवत आहे.
- दुसरीकडे पाकिस्तानी शास्त्रज्ञ अब्दुल कादीर खानच्या मदतीने अणुतंत्रज्ञान मिळवून उत्तर कोरियानेही 10-12 संहारक शस्त्रांची निर्मिती केली आहे.
युरोपमध्‍ये 6 ठिकाणी बॉम्ब
- फास डॉट ओआरजीनुसार, रशिया प्रत्येक वर्षी आपल्या शस्त्रगारातून 500 संहारक शस्त्रे कमी करीत आहे.
- मात्र आजही जगातील 93 टक्के संहारक शस्त्रे रशियाजवळ आहे.
- 1949 मध्‍ये पहिल्यांदा रशियाने अणुचाचणी घेतली होती.
- एका अहवालानुसार, युरोपमध्‍ये सहा ठिकाणी 180 बी 61 बॉम्ब बसवले गेले आहे.
- हे ठिकाण बेल्जियम, जर्मनी, इटली, नेदरलँड्स आणि तुर्कस्तानसारख्‍या देशांमध्‍ये आहे.
उत्तर कोरियाने बनवले हायड्रोजन बॉम्ब?
- 6 जानेवारी उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्बची चाचणी घेऊन पूर्ण जगाला हादरवले आहे.
- अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्वेनुसार, त्यावेळी या भागात 5.1 तीव्रतेचा भूकंप आला होता.
- या देशाने यांगयोन आण्विक संशोधन केंद्रात अणू आणि हायड्रोजन बॉम्ब बनवले आहे.
- डीपीआरकेनुसार, हा हायड्रोजन बॉम्ब सोव्हिएत संघाने बनवलेल्या बॉम्बच्या तुलनेत शक्तिशाली आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा कोणत्या देशाकडे किती आण्विक शस्त्रे आहेत?