आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गे मॅरेज : कोर्टाच्या निर्णयानंतर व्हाइट हाऊस न्हाले सप्तरंगात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - समलैंगिक विवाह करण्यावरील बंदी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी उठवल्यानंतर देशभरातील समलैंगिक संघटनांनी जल्लोष साजरा केला. व्हाइट हाऊसची इमारत या निमित्ताने सप्तरंगी रोषणाईने उजळून निघाली होती. या निर्णयामुळे देशाची एकजूट झाली आहे, अशी प्रतिक्रिया तत्पूर्वी राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा यांनी दिली.

जिंदाल यांच्याकडून टीका: विवाहाबद्दलच निर्णयावर भारतीय वंशाचे अमेरिकी बॉबी जिंदाल यांनी टीका केली. आम्ही करू तो कायदा, या न्यायाने कोर्टाने हा निवाडा दिला आहे. खरे तर त्यावर जनमताचा कौल अपेक्षित होता. स्त्री-पुरुषाचा विवाह ही ईश्वराने ठरवलेली बाब आहे. मानव त्यात काहीही बदल करू शकत नाही, असे जिंदाल यांनी म्हटले.
बातम्या आणखी आहेत...