आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Obama Always Keep A Small Idol Of Hanumanji With Them

बराक ओबामा म्हणाले, हनुमानजींची मूर्ती माझी लकी चार्म, नेहमी असते सोबत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओबामांकडे असलेली हनुमानाची मूर्ती. - Divya Marathi
ओबामांकडे असलेली हनुमानाची मूर्ती.
वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा यांची हनुमानावर श्रद्धा आहे, असे म्हटले तर आश्चर्य वाटेल. परंतु आेबामा हनुमानाची प्रतिमा जवळ बाळगतात. ती त्यांना लकी चार्म वाटते. निराशा आल्यानंतर त्यांना पवनसुताकडून प्रेरणा मिळते.

राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा यांनी यूट्यूबला दिलेल्या एका मुलाखतीत या गोष्टीबद्दल मोकळेपणाने सांगितले. व्हाइट हाऊसच्या वतीने तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी या मुलाखतीचे आयोजन केले होते. यूट्यूबचे निर्माते निल्सन यांना शुक्रवारी दिलेल्या मुलाखतीत आेबामांना वैयक्तिक महत्त्वाच्या वस्तू दाखवण्यास सांगण्यात आले. त्या वेळी त्यांनी खिशातील छोट्या-छोट्या गोष्टी बाहेर काढून दाखवल्या. या सर्व गोष्टी मला अनेकांकडून मिळालेल्या भेटवस्तू आहेत. त्यावरून मला त्या लोकांची आठवण राहते. पाेप फ्रान्सिक यांच्याकडून मिळालेली माळ, एका भिक्खूने दिलेली भगवान गौतम बुद्धांची प्रतिमा, हिंदू देवता हनुमानाच्या मूर्तीसह इतर गोष्टी आहेत, असे सीएनएनने म्हटले आहे.

आेबामा म्हणाले, मी नेहमी या गोष्टी सोबत बाळगताे. परंतु त्यांना सातत्याने सोबत ठेवतो असा अंधश्रद्धाळूदेखील नाही. मात्र या गोष्टी सोबत असतात. कारण राष्ट्राध्यक्षपदापर्यंत पोहोचण्याच्या दीर्घ वाटचालीचे स्मरण मला यातून होते. मला कधीतरी थकल्यासारखे वाटते तेव्हा निराश वाटू लागते. मी खिशात हात टाकताच मला त्यातून बाहेर पडेन असे वाटते.