आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओबामांनी विकत घेतले रश्दींचे पुस्तक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे वाचनप्रेमी असल्याचे सर्वश्रुतच आहे. रविवारी त्यांनी मुलगी शासा आणि मालिया यांच्यासोबत एका पुस्तकाच्या दुकानाला भेट दिली आणि ९ पुस्तके विकत घेतली.
यात भारतवंशीय लेखक सलमान रश्दी यांच्या एका पुस्तकाचाही समावेश आहे. "टू इयर्स एट मंथ्स अँड ट्वेंटी ऐट नाइट्स' असे या पुस्तकाचे नाव आहे. शिवाय जोनाथन फ्रँझन लिखित "प्युरिटी अ नॉव्हेल' तसेच सिंथिया वोइट यांची काही पुस्तकेही त्यांनी विकत घेतली. दुकानातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी मुलींसाेबत आइस्क्रीमचाही आस्वाद घेतला.