आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओबामांच्या ऑफिसमध्ये साजरी झाली दिवाळी, म्हणाले- आगामी अध्यक्षांनी परंपरा कायम ठेवावी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'अंधार कापणारा प्रकाशोत्सव म्हणजे दिवाळी' असे ओबामा म्हणाले. - Divya Marathi
'अंधार कापणारा प्रकाशोत्सव म्हणजे दिवाळी' असे ओबामा म्हणाले.
वॉशिंग्टन - व्हाइट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हाइट हाऊसमधील त्यांचे ऑफिस ओव्हल येथे दिवाळी सेलिब्रेशन केले. ओबामांनी दिप प्रज्वलीत करुन दिवळी साजरी केली. यावेळी अमेरिका प्रशासनातील भारतीय वंशाचे अनेक अधिकारी उपस्थित होते. ओबामा म्हणाले, मला आशा आहे की माझ्यानंतर अध्यक्ष होणारी व्यक्ती ही परंपरा अशीच चालू ठेवेल.
व्हाइट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करणारे पहिले राष्ट्राध्यक्ष ओबामा
- ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर 2009 मध्ये त्यांनी सर्वप्रथम व्हाइट हाऊसमध्ये दिवाळी साजरी केली होती.
- ओव्हल ऑफिसमध्ये दिप प्रज्वलीत केल्यानंतर ओबामा म्हणाले, 'मला अभिमान आहे की 2009 मध्ये मी व्हाइट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करण्याची परंपरा सुरु केली.'
- 'माझे आणि मिशेलचे भारताने मनापासून स्वागत केले होते. मुंबई दौऱ्यात आम्ही भारतीय संगीतावर ठेका देखिल धरला होता.'
- व्हाइट हाऊसच्या अधिकृत फेसबुक पेजवर ओबामांनी लिहिले, 'यंदा प्रथमच मी ओव्हल ऑफिसमध्ये दिप लावला. हा माझ्यासाठी सन्मानाचा अनुभव होता. दिवाळी प्रकाशाचा उत्सव असून अंधारही एका दिव्याने नष्ट होऊ शकतो याचे प्रतिक आहे. मला आशा आहे की माझ्या नंतर व्हाइट हाऊसमध्ये येणारे नवे राष्ट्राध्यक्ष ही परंपरा कायम ठेवतील.'

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...