आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Obama Cries While Addressing On Gun Control In America

शस्त्र परवान्यांवर नियंत्रण आणण्याचे समर्थन करताना ओबामांना कोसळले रडू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हाइट हाऊसमध्ये एका कार्यक्रमात ओबामा - Divya Marathi
व्हाइट हाऊसमध्ये एका कार्यक्रमात ओबामा
वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांना बंदूकींवर नियंत्रण आणण्याचे समर्थन करताना रडू कोसळले. देशात झालेल्या गोळीबाराच्या घटनांमध्ये दरवर्षी कित्येक लोकांचा जीव गेला, हे सांगतांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भावूक झाले. त्यांनी बंदूकींवर नियंत्रण आणण्याच्या प्रस्तावावर जोर दिला.

का झाले ओबामांना अश्रू अनावर
ओबामा मंगळवारी रात्री व्हाइट हाऊसमध्ये गन कंट्रोल पॉलिसीच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी तीन वर्षांपूर्वी कनेक्टिकटच्या न्यू टाऊन मधील एका शाळेत झालेल्या गोळीबारात 20 मुले ठार झाल्याचा उल्लेख केला. यावेळी ओबामा भावूक झाले. ते म्हणाले, 'मी जेव्हा त्या मुलांबद्दल विचार करतो तेव्हा वेड लागायची वेळ येते. आम्हाला सगळ्यांना अमेरिकन काँग्रेसकडे मागणी करावी लागले की गन लॉबीच्या खोटारडेपणाचा जोरदार विरोध झाला पाहिजे.'

परवाना पद्धत कडक झाली पाहिजे
ओबामांनी शस्त्र परवाना प्रक्रिया कडक करण्याच्या उपाययोजनांची घोषणा केली. त्यात बंदूक विक्रेत्याकडे परवाना असणे गरजेचे करण्याबरोबरच ज्यांना शस्त्र विक्री होत आहे त्याची पार्श्वभूमी तपासणेही महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे.

ओबामांनी दिला इशारा
ओबामा म्हणाले, गन लॉबी सरकारच्या कारवाईत अडचणी आणू शकते. अमेरिकन काँग्रेसवर दबाव टाकू शकते पण नियंत्रण आणू शकत नाही.
ओबामा म्हणाले, आम्ही बंदूकींवर नियंत्रण आणण्याचे पूर्णपणे समर्थन करतो, मात्र संसदेत बहुमत नसल्याने कायदा करण्यात अडचणी येत आहेत.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, ओबामांना अश्रू अनावर