आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आेबामांचे जनतेवर खापर; शस्त्र कायदा कडक नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेंचो मिरेज (कॅलिफोर्निया) - जनता याबाबत जागृत नाही, अशा शब्दांत राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा यांनी आपल्या अपयशाचे खापर फोडले आहे. दक्षिण कॅरोलिनाच्या चर्चमध्ये झालेल्या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

अमेरिकी संसदेवर शक्तीशाली गन लॉबीचा दबाव आहे. त्यामुळे हा कायदा मंजूर होऊ शकत नाही. राष्ट्राध्यक्ष आेबामा एका मुलाखतीमध्ये म्हणाले, अमेरिकेतील बंदुकीने होणार्‍या हिंसाचाराचे प्रमाण इस्त्रायल, फ्रान्स आणि जपानपेक्षा खूप अधिक आहे. असे असुनही शस्त्र कायद्यात काही दुरूस्ती होईल, अशी चिन्हे दिसत नाहीत. विशेष म्हणजे संसदेच्या दोन्ही सभागृहात रिपब्लिकन पार्टीचे बहुमत आहे. परंतु राष्ट्राध्यक्ष आेबामा यांच्या डेमोक्रॅटिक पार्टी दोन्ही सभागृहात कमी पडते. आेबामा यांनी गन लॉबीला लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१२ मध्येही कनेक्टीकट येथील विद्यालयातील नरसंहाराच्या घटनेत त्यांनी गन लॉबीवर टीका केली होती.

जनतेने जागृत व्हावे
गोळीबाराच्या घटनेनंतर आेबामा शस्त्र कायद्यावर पाचवेळा जाहीरपणे बोलले आहेत. जोपर्यंत अमेरिकेची जनता जागृत होणार नाही. तोपर्यंत काहीही होऊ शकणार नाही. जनतेने याबद्दल मागणी केली पाहिजे. त्यात परिवर्तन व्हायला हवे, असे जनतेने म्हटले पाहिजे.

आेबामा यांच्या सल्ल्यांकडे कानाडोळा
रायफल किंवा शस्त्र विक्री करण्यापूर्वी खरेदी करणार्‍याची सर्व माहिती तपासली गेली पाहिजे. लष्करी पद्धतीच्या शस्त्र विक्रीवर बंदी असली पाहिजे. दारू गोळ्याची विक्रीही मर्यादित स्वरूपात असावी. हे सल्ले राष्ट्राध्यक्षांनी दिले होते. परंतु खासदार त्याकडे कानाडोळा करतात.

बंदूक बाळगण्याचा सर्वांना कायद्याने अधिकार
अमेरिकेचा कायदा नागरिकांना बंदूक बाळगण्याचा अधिकार देतो. अमेरिकेचा वारसा समजून अनेक लोकांना बंदूक बाळगणे म्हणजे प्रतिष्ठा वाटते.

२९७ पटींनी अधिक
अमेरिकेतील गोळीबाराच्या घटना जपानपेक्षा २९७ पटींनी अधिक असल्याचे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. त्यावरून देशातील हिंसाचार आणि गुन्हेगारीचे स्वरूप किती गंभीर बनले आहे, हे लक्षात येते. राष्ट्राध्यक्ष आेबामा यांनीच ही माहिती ट्विटरवरून जाहीर करून चिंता व्यक्त केली होती. फ्रान्सहून हे प्रमाण ४९ टक्के तर इस्रायलहून ३३ टक्के अधिक आहे, असे आेबामा यांनी म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...