आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओबामांच्या मुलींनी 8 वर्षापूर्वी व्हाईट हाऊसमध्ये गेल्या गेल्या अशी केली होती मस्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हाईट हाउसमध्ये मस्ती करताना ओबामांच्या मुली. वर बुश यांच्या मुली जेना आणि बार्बरा... - Divya Marathi
व्हाईट हाउसमध्ये मस्ती करताना ओबामांच्या मुली. वर बुश यांच्या मुली जेना आणि बार्बरा...
इंटरनॅशनल डेस्क- अमेरिकचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आज आपला ५६  वा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्त आम्ही तुमच्यासाठी एक वेगळी बातमी घेऊन आलो आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या दोन मुली जेना आणि बार्बराने ओबामांच्या मुलींचे काही फोटोज या वर्षी जानेवारी महिन्यात जारी केले होते. हे सर्व फोटोज ते फोटोज आहेत जेव्हा ओबामांच्या परिवाराने पहिल्यांदा व्हाईट हाउसमध्ये एंट्री केली होती. त्यावेळी बुश फॅमिली व्हाईट हाऊसला बाय बाय करणार होते. त्यावेळी ओबामांच्या मुली साशा 7 वर्षाची आणि मालिया 10 वर्षाची होती. तर, बुश यांच्या जुळ्या मुलींचे वय 20 वर्ष होते. साशा आणि मालियाला लिहले होते भावनिक पत्र....
 
- जेना आणि बार्बरा यांनी साशा आणि मालियाला ‘प्लेईंग हाऊस इन द व्हाईट हाऊस ’ या शीर्षकखाली भावनिक पत्र लिहले होते.
- या पत्रात बुश यांच्या लेकी म्हणतात, तुम्ही आता जादुई वास्तूत राहणार आहेत. चार वर्षे तुम्हाला मिळाली आहेत.. ती छान उपभोगा. नाहीतर हा हा म्हणता ती संपतील.
- मित्र-मैत्रिणी पारखून निवडा. असे मित्र जे तुम्हाला निवांत करतील, तुमच्याशी धम्माल करतील, आणि आधारही देतील. 
- तुमचा लाडका कुत्रा, मांजर जो कुणी पाळीव प्राणी असेल, त्याच्यावर खूप माया करा. कधीकधी काही प्रसंगात या मुक्या प्राण्यांचा सहवास खूप आधाराचा ठरतो. 
- व्हाईट हाऊसमध्ये राहण्याची अपूर्व संधी तुम्हाला मिळाली आहे. त्या हिरव्यागार लॉनवर मनसोक्त खेळा, तिथे लोळा. घसरगुंडी करा. टेनिस बॉलने खेळा. मनमुराद पोहा. तुमचं बालपण विसरू नका. ते लवकर सरू देऊ नका. 
- आमच्या वडिलांची प्रतिमा गेले काही वर्षे डागाळली गेली. त्यांची खिल्ली उडविली गेली.. पण काहीही असो. ते आमचे वडिल आहेत.. जन्मदाते. ते म्हणजे काही वर्तमानपत्रातलं व्यंगचित्र नाहीत. 
- तुमच्या वडिलांना आम्ही चांगले ओळखतो असे सांगणारे अनेक जण तुम्हाला भेटतील. पण तुमचे बाबा खरे कसे आहेत, हे तुम्हालाच माहीत असणार. 
- त्यामुळे तुमच्या मनातली बाबाबद्दलची प्रतिमा बदलू देऊ नका. कारण या जगात तुम्ही आलात, तेव्हा तुम्हाला बघून ज्या अपार कौतुकाने त्यांनी पाहिलं, ते इतरांना कळणार नाही. 
- तुम्हाला प्रथमच शाळेच्या दरवाजाशी सोडताना आणि दप्तर सावरत तुम्ही जाताना बघून त्यांच्या मनात काय कालवाकालव झाली, हे तुम्हीच समजू शकता. 
- म्हणूनच महत्त्वाचं हे की तुमचे बाबा तुमच्यासाठी किती ग्रेट आहेत, हे कधीही विसरू नका. राजकीय निर्णय घेताना, भाषण करताना, परदेशदौरे करताना ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असतील, पण त्यांच्या आत जो माणूस आहे, तो तुमचा खरा बाबा! ती प्रतिमा कधीही विसरू नका.’’
 
पुढे स्लाईडद्वारे नजर टाका, ओबामांची जेव्हा व्हाईट हाऊसमध्ये एंट्री झाली तेव्हाचे क्षण...
बातम्या आणखी आहेत...