आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

88 वर्षांत प्रथमच US राष्ट्राध्यक्षांचा क्युबा दौरा, फिडेल कॅस्ट्रोला नाही भेटणार ओबामा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओबामांचा ऐतिहासिक क्युबा दौरा सुरु झाला आहे - Divya Marathi
ओबामांचा ऐतिहासिक क्युबा दौरा सुरु झाला आहे
हवाना - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा तीन दिवसांच्या क्युबा दौऱ्यावर आहेत. 88 वर्षांत क्युबाला भेट देणारे ओबामा अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यांच्यासोबत पत्नी मिशेल, दोन्ही मुली साशा आणि मालिया आणि सासू मॅरियन रॉबिन्सन देखिल आहेत. क्युबा आणि अमेरिके दरम्यान अतिशय तणावाचे वातावरण राहिलेले आहे. ओबामांआधी 1928 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कूलिज येथे आले होते.

ट्विटरवर विचारले - कसा आहेस क्यूबा
- क्युबाची राजधानी हवाना येथे कारमध्ये बसल्या बरोबर ओबामांनी ट्विट केले - कसा आहेस क्यूबा.
- ओबामा रविवारी सायंकाळी क्युबात पोहोचले होते.
- आबामांच्या स्वागतासाठी क्युबाचे हुकूमशहा राऊल कॅस्ट्रो आले नव्हते. त्याऐवजी परराष्ट्र मंत्र्यांनी त्यांचे स्वागत केले.
- आज ओबामा आणि राऊल यांची भेट होण्याची शक्यता आहे. मात्र सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे क्युबाचे माजी राज्यकर्ते फिडेल कॉस्ट्रोंना ते भेटणार नाहीत.
- ओबामांचे कुटुंब पूर्ण तीन दिवस क्युबामध्ये मुक्काम करणार नाहीत, ते लॅटिन अमेरिकेतील देशांचा दौरा करणार आहेत.
- ओबामांनी अमेरिका अॅम्बिसी स्टाफला म्हटले, की 'एतिहासिक दौऱ्यासोबत आपल्याकडे मोठी संधी देखिल आहे.'
- हवानामध्ये ओबामा अमेरिकी अॅम्बेसिडरच्या निवासस्थानी थांबेल आहेत.
सर्वप्रथम कोणाला भेटले
- ओबामा सर्वप्रथम क्युबातील आपल्या स्टाफला भेटले.
- ते म्हणाले, 'असे वाटत आहे जणू 1928 मध्ये आलो आहे, जेव्हा प्रेसिडेंट कुलिंज येथे आले होते.'
- ओबामा कुटुंबियांसह ओल्ड क्युबालाही जाणार आहेत. तिथे ते टेंपा बे रेज आणि क्युबा टीममध्ये होणारा बेसबॉल सामना पाहातील.

कसे आहेत दोन्ही देशातील संबंध
- 1960 च्या दशकता दोन्ही देशांदरम्यानचे संबंध संपुष्टात आले होते. 1959 मध्ये कम्युनिस्ट क्रांतीनंतर अमेरिकेने क्युबावर बंदी घातली होती.
- या बंदीमुळे अमेरिकेला वार्षिक 1.2 बिलियन डॉलरचा तोटा होत होता.
- 2014 मध्ये ओबामांनी दोन्ही देशांदरम्यान आर्थिक आणि राजनैतिक संबंध सुधारण्यावर भर दिला.
- क्‍युबाचे अध्यक्ष राऊल कॅस्ट्रो आणि ओबामा यांची 2014 मध्ये भेट झाल्यानंतर जगभरात आश्‍चर्याचा धक्का बसला होता.
- जवळपास एक वर्ष कॅनडा आणि व्हॅटिकन येथे दोन्ही देशांदरम्यान गुप्त वार्ता चालली होती. स्वतः पोप फ्रान्सिस यात सहभागी होते.
- या चर्चेचा मुख्य उद्देश क्युबामधून दहशतवादाला प्रोत्साहन दिले जाते, हा या देशावरील ठपका मिटवण्याचा होता. क्युबावर लादलेले निर्बंध, येथे अमेरिकन नागरिकांना येण्यास घातलेली बंदी, आर्थिक निर्बंध हटवणे हा होता.
- ऑगस्ट 2015 मध्ये अमेरिकेने क्युबामध्ये आपला दुतावास पुन्हा सुरु केला.
- सप्टेंबर 2015 मध्ये क्युबाने अमेरिकेत आपला दुतावास सुरु केला.
हेही वाचा,
पुढील स्लाइडवर वाचा, ओबामांचा संपुर्ण कुटुंबासह क्युबा दौरा... या दौऱ्यावर ट्रम्प यांनी साधला निशाणा....
बातम्या आणखी आहेत...