अँकॉरेज (अलास्का) - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा जेव्हा व्हाइट हाऊसच्या बाहेर असतात तेव्हा त्यांना दिले जाणारे पाणीही अनेक तपासण्यांनंतरच त्यांना दिले जाते. पण एवढ्या सुरक्षेच्या गराड्यात राहणाऱ्या ओबामांना अलास्काच्या जंगलात अस्वलाने खाऊन अर्धवट सोडलेला मासा खाऊन उदरनिर्वाह करावा लागला. ओबामांबरोबर सर्व्हायव्हल एक्सपर्ट बेयर ग्रिल्स होता. ओबामा ग्रिल्सच्या 'रनिंग वाइल्ड' शोमध्ये सहभागी होणार आहेत. हा शो वर्षाच्या अखेरिस टेलिकास्ट होणार आहे. ओबामांनी तीन दिवसांच्या या शुटिंगदरम्यानचे त्यांचे अनुभव शेअर केले आहेत.
ओबामा म्हणाले, ऑफिसच्या कैदेतून सुटलो
ओबामा म्हणाले, हा अनुभव माझ्यासाठी फार छान ठरला. मी ऑफिसच्या कैदेत नाही आणि येथे सुटाबुटात राहण्याची सक्तीही नाही. बेयर ग्रिल्सबरोबर ट्रेकिंगसाठी मी पूर्ण तयारी केली होती. पण त्याने लंचमध्ये जे खाऊ घातले त्यासाठी मी बिल्कुल तयार नव्हतो. त्या दुपारी आम्ही नदीच्या किनाऱ्यावर होतो. बेयर म्हणाला चला लंचला जाऊयात आणि मी त्याला होकार दिला.
अस्वलाने सोडलेले शिकार
त्याने त्याच्या पाठीवरील बॅगमधून गवतामध्ये गुंडाळलेला मासा काढला. त्याने सांगितले की, हा मासा म्हणजे एका अस्वलाने खाताना अर्धवट सोडलेला होता. पण हे सांगणे गरजेचे होते का? हा मासा आहे एवढे सांगितले असते तरी चालले असते, असे मी त्याला म्हणालो. त्यानंतर त्याने आग पेटवली आणि तो मासा भाजायला लागला. त्यावेळी मी विचार करू लागलो, बरं झालं याला मासा मिळाला ते, कारण हा तर काहीही खातो. थोड्याच वेळात आमचा मासा भाजून तयार झाला होता. मी एक तुकडा उचलला आणि खाल्ला. खरंच तो मासा फारस चवदार होता. बेयर फार चांगला कुक तर नाही, पण त्याला मासा व्यवस्थित भाजता येतो. आमच्याकडे तिखट मसाला नव्हता तो असता तर चव आणखी वाढली असती. सगळ्यांना माझा एक सल्ला आहे. जिवनात एकदा तरी असे विचित्रसारखे वागायला हवे. माझे सिक्रेट एजंट मला कोड वर्डमध्ये बीयर (भालू) म्हणतात. जेव्हा मी प्रोटोकॉल तोडून इकते तिकडे जातो तेव्हा ते म्हणतात, बीयर सुटला. याठिकाणी त्यांच्याबरोबर नेहमीच असे होते, असे ओबामा म्हणाला.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTO आणि शेवटच्या स्लाईडवर ओबामांचा मासा खातानाचा VIDEO