आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘हिलरी क्लिंटनच्या रूपाने चांगला पर्याय’, ओबामांनी केले कौतुक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प व हिलरी क्लिंटन यांच्यातील लढाई काल्पनिक भूतकाळ विरुद्ध भविष्यकाळासारखी वाटते, अशा शब्दांत राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा यांनी टीका केली आहे. देशासमोर हिलरी यांच्या रूपाने चांगला पर्याय आहे, असे त्यांनी सांगितले.

आपल्याला काल्पनिक भूतकाळात रस आहे की आपण चांगल्या भविष्यकाळाकडे वाटचाल करावी, अशा पद्धतीचे दोन पर्याय अमेरिकी नागरिकांपुढे ठेवण्यात आले आहेत. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत केवळ हेच दोन पर्याय तुमच्यासमोर आहेत, असे आेबामा म्हणाले. क्लिंटन यांच्या हजारो समर्थकांना मार्गदर्शन करताना त्यांनी जनतेसमोरील पर्यायांची चर्चा केली.
मंगळवारी कॅरोलिनामध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते. अमेरिका म्हणून आपण कशा प्रकारे वाटचाल करावी, याचा निर्णय नोव्हेंबरमध्ये होणार आहे. त्यामुळेच नागरिकांनी हिलरी यांच्या पाठिशी रहावे, असे आवाहन त्यांनी केले. आपल्या भाषणात आेबामांनी क्लिंटन यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात येणार नसल्याच्या एफबीआयच्या निर्णयाचा उल्लेख टाळला. परंतु क्लिंटन यांचा अनुभव व निर्णयक्षमतेवर पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी म्हटले. दरम्यान, देशाच्या प्रमुखपदासाठी डोनाल्ड ट्रम्प लायक उमेदवार नाहीत, असा आरोप डेमोक्रॅटिक पार्टीच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी यावेळी केला. आेबामांनी अतिशय कठीण कालखंडातून वाटचाल केली. मी त्यांना जवळून पाहिले आहे. ते देशाचे नव्हे जागतिक नेते आहेत.
एकजुटीचे बळ
आपण सर्व मिळून भवितव्य घडवू शकतो. केवळ एक व्यक्ती, समूह वा राज्ये मिळून नव्हे, तर एकसंघ अमेरिका होऊन ही गोष्ट साध्य केली जाऊ शकते, असा विश्वास त्यांच्यात आहे. एकजुटीचे बळ महत्त्वाचे असते, याची जाणीव हिलरींना आहे, अशा शब्दांत आेबामांनी त्यांचा गौरव केला.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...