आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रान्‍सचा पुन्‍हा बॉम्‍ब हल्‍ला, आण्विक शस्‍त्राचे जहाजही सीरियाकडे रवाना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेलेक (तुर्कस्‍तान) - पॅरिस हल्‍ल्‍याला प्रत्‍युतर म्‍हणून फ्रान्‍सने आज (मंगळवारी) सलग दुसऱ्या दिवशी आयएसआयएसचे मुख्‍यालय समजल्‍या जाणाऱ्या सीरियातील रक्का शहरावर बॉम्ब डागले. यूएस गुप्‍तचर यंत्रणेच्‍या मदतीने फ्रान्‍स हे हल्‍ले करत आहे. दरम्‍यान, सोमवारी मध्‍यरात्रीपर्यंत फ्रान्‍सने किती लढाऊ विमानांना रक्‍काकडे पाठवले, हे अजून स्‍पष्‍ट झाले नाही. पण, जॉर्डन आणि यूएईकडून फ्रान्‍सचे 12 फाइटर जेट्स सीरियाकडे उड्डाण करत आहेत. शिवाय फ्रान्‍सने आण्विक शस्‍त्रसाठा असलेले आपले एक विमानवाहू लढाऊ जहाज समुद्रात उरवले असून, ते सीरियाकडे कूच करत आहे.

'आयएसआयएस'ने फ्रान्‍सची राजधानी पॅरिसमध्‍ये हल्‍ले करून करून 129 व्‍यक्‍तींना ठार केले. या हल्ल्यानंतर फ्रान्सने सिरियातील आयएसच्या अड्ड्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी हल्ले वाढवले. दुसरीकडे देशात धाडसत्र राबवून आयएसच्या 23 संशयित दहशतवाद्यांना अटक तर 100 जणांना स्थानबद्ध करण्यात आले. दरम्‍यान, या हल्‍ल्‍यात सहभागी आठव्‍या दहशतवाद्याची ओळख पटली असून, अब्देलहामिद अबऔद असे त्‍याचे नाव आहे. तो बेल्जियममध्‍ये राहणारा आहे. पोलिस त्‍याच्‍या घरापर्यंत पोहोचलेत.
अमेरिका भूदल उतरवणार नाही
दहशतवादी संघटना 'आयएसआयएस'ने पॅरिसमध्‍ये मोठे हल्‍ले केल्‍यानंतरही त्‍यांच्‍याविरुद्ध भूदल सैन्‍य उतरवले जाणार नसल्‍याच्‍या रणनीतीवर अमेरिकेचे राष्‍ट्रपती बराक ओबामा कायम आहेत. या बाबत ओबामा सोमवारी म्‍हणाले, ''अमेरिकेच्‍या नेतृत्‍वात आयएसवर होत असलेले हल्‍ले प्रभावी ठरत आहेत. पण, त्‍यांच्‍या विरुद्ध सीरियामध्‍ये भूदल उतरवणे तर ती चूक ठरेल,'' अशा शब्‍दांत त्‍यांनी आपली भूमिका स्‍पष्‍ट केली.

दुसरीकडे फ्रान्‍सचे राष्ट्रपती फ्रांस्वा ओलांद यांनी सीरिया प्रकरणात आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर सहकार्य करण्‍याची मागणी केली आहे. ओलांद म्‍हणाले, ''पॅरिस हल्‍ल्‍याचा बदला घेण्‍यासाठी आम्‍ही आयएसला नेस्‍तनाबुदत करू. फ्रान्‍सने युद्ध सुरू केले आहे'', असे ते म्‍हणाले.
का द्यावे लागले ओबामा यांना स्‍पष्‍टीकरण ?
'आयएसआयएस'विरुद्ध लढण्‍यासाठी अमेरिका प्रभावी पाऊल उचलत नसल्‍याचा आरोप फ्रान्‍स हल्‍ल्‍यानंतर होत आहे. दरम्‍यान, तुर्कस्‍तानात होत असलेल्‍या जी 20 शिखर परिषदेमध्‍ये ओबामा यांना आंतराष्‍ट्रीय पत्रकारांकडून या प्रश्‍नावर धारेवर धरले गेले. शिवाय अमेरिकेतील विरोधी पक्षांसह फ्रान्‍सनेही हा मुद्दा उचलला. आयएसविरुद्ध लढण्‍यासाठी यूएस मिलिट्रीला अधिक अग्रेसिव्‍ह अप्रोच वाढवावा लागणार असल्‍याचे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

> टीकेनंतर 'आयएसआयएस'विरुद्ध भूदल उतरवण्‍यासाठी ओबामा तयार झाले नाहीत. काही आंतरराष्‍ट्रीय समीक्षकच्‍या मतानुसार, सीरियामध्‍ये बशर सरकारच्‍या विरोधात लढत असलेल्‍या बंडखोरांना अमेरिका मदत करत आहे. त्‍यामुळेच या युद्धात अमेरित सरळ भाग घेत नाही. एवढेच नाही तर अमेरिकेच्‍या याच धोरणामुळे सीरियात आयएसआएसचा प्रभाव वाढला असल्‍याचे समीक्षकांनी म्‍हटले.

ओबामा यांनी काय म्‍हटले ?
> फ्रान्‍सचा हल्‍ला भयानक आणि हादरून सोडणारा आहे, असे ओबामा यांनी म्‍हटले. शिवाय आयएसआयएसला उखडून टाकण्‍यासाठी आपण प्रयत्‍न करणार असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.
>ओबामा यांनी म्‍हटले, '' ज्‍या रणनीतीमुळे जिंकण्‍याची शक्‍यता सर्वाधिक आहे त्‍याच रणनीतीने आम्‍ही पुढे जाणार आहोत. '' शिवाय या कारवाईत वाढ करण्‍यात येईल, असेही त्‍यांनी सांगितले.

इराकमुळे घेतली धास्‍ती ?
वर्ष 2003 मध्‍ये अमेरिकेने इराकमध्‍ये आपले भूदल उतरवले होते. त्‍यात अनेक सैनिक शहीद झाले. त्‍यामुळेच अमेरिका आता या युद्धात आपले भूदल उतरवयाला घाबरत असल्‍याचे सांगितले जात आहे.

पुढील स्‍लाइड्सवर पाहा संबंधित फोटोज...