आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओबामांनी नरेंद्र मोदींना संबोधले "भारताचा रिफॉर्मर इन चीफ', टाइमच्या लेखात उल्लेख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी टाइम मॅगझीनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रोफाइल लिहिली आहे. यामध्ये त्यांनी मोदींना "भारताचा रिफॉर्मर इन चीफ' म्हणजे सुधारक असल्याचे सांगितले. ओबामांनी या लेखात मोदींनी सुरू केलेल्या अनेक योजनांचा उल्लेख केला आहे.

प्रोफाइलमध्ये ओबामा लिहितात की, नरेंद्र मोदी लहानपणी आपल्या वडिलांना चहा विकण्यात मदत करत होते. आता ते जगातील सर्वात मोठ्या लाेकशाही देशाचे नेते आहेत. गरिबीच्या दिवसांतून पंतप्रधान होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास भारताच्या उदयाची गतिशीलता आणि क्षमता दर्शवते. त्यांनी भारतीयांच्या मदतीचा संकल्प सोडला आहे. याबरोबर दारिद्र्य कमी करणे, शैक्षणिक सुधारणा, महिला, मुलींचे सक्षमीकरण आणि हरितगृह वायूवर लक्ष देत भारताची वास्तविक आर्थिक क्षमता साध्य करण्याचे महत्त्वाकांक्षी व्हिजन दिसून येते.

"भारताप्रमाणेच प्राचीन आणि आधुनिकतेचा समन्वय साधण्याचा ते पुरस्कार करतात. भारतीय नागरिकांशी टि्वटरवरून संपर्क ठेवत डिजिटल भारताची कल्पना करणारे ते एक योग साधक आहेत. ते जेव्हा वॉशिंग्टनला आले होते तेव्हा मी आणि मोदी मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांच्या स्मारकाकडे गेलो होतो. आम्ही तिथे किंग आणि महात्मा गांधींच्या मूल्यांची आठवण काढली. दोन्ही देशांच्या विविधतेत उभयतांचे शक्तीस्थळ एकवटले आहे आणि तिचे संरक्षण करणे आपली जबाबदारी आहे यावर आम्ही लक्ष दिले. एक अब्ज भारतीयांसोबत राहणे आणि एकत्रित पुढे जाणे जगासाठी प्रेरणादायक मॉडेल होऊ शकते,अशी मोदी यांची धारणा आहे,' असेही ओबामांनी म्हटले आहे.
उत्तरादाखल आभार
ओबामांनी प्रोफाइल मध्ये मोदी यांच्या आयुष्यातील अनेक यशांची नोंद घेतली. त्याच्या उत्तरादाखल पंतप्रधान मोदी यांनीही ओबामा यांचे आभार व्यक्त केले आहेत.