आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बराक ओबामा महिलेवर भडकले, म्हणाले \'शेम ऑन यू\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉ‍शिंग्टन - अमेरिकेचे अध्‍यक्ष बराक ओबामांनी व्हाइट हाऊस येथील भाषणात व्यत्य आणणा-या महिलेला फटकारले. तसेच सुरक्षा कर्मचा-यांना आदेश देऊन तिला बाहेर काढले. ओबामांनी प्रथम त्या महिलेला समजवण्‍याचा प्रयत्न केला. मात्र ती ऐकायला तयार नव्हती. शेवटी ओबामा म्हणाले शेम ऑन यू (तुला लाज वाटली पाहिजे). या महिलेला बाहेर काढू शकता का? तुम्ही शांतता राखा किंवा बाहेर काढावे लागेल.
नेमकी घटना काय ?
ओबामा बुधवारी (ता.24) व्हाइट हाऊसमध्‍ये समलैंगिक आणि ट्रान्ससेक्शुल व्यक्तींच्या हक्कांविषयी बोलत होते. या दरम्यान उपस्थित एक महिला त्यांच्या भाषणात अडथळे आणत होती. गुटेरेज नावाची ही महिला मोठ्याने म्हणाली, की मी अनिवासी अमेरिकन आहे. ट्रान्ससेक्शुल लोकांबाबत अपशब्द ऐकून दुःखी आहे. सुरुवातीला ओबामा यांनी त्या महिलेला शांत करण्‍याचा प्रयत्न केला. पण त्याच्या तिच्यावर काहीही परिणाम झाला नाही. त्यानंतर ओबामा यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले.

पुढील स्लाइड्सवर पाहा, ओबामांच्या भाषणात व्यत्य आणणा-या जेनिसेट गुटेरेज या महिलेची छायाचित्रे...