आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियाच्या विरोधात उभे राहा, जी-७ देशांना अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे आवाहन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रुएन (जर्मनी) - ‘युक्रेनमधील रशियाच्या आक्रमक’ भूमिकेच्या विरोधात सर्व देशांनी उभे ठाकण्याची वेळ आली आहे, असे आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा यांनी रविवारी येथे केले. जी-७ परिषदेच्या निमित्ताने ते बोलत होते. युक्रेनमुळे रशियाला जी-७ मधून बाहेर काढण्यात आले आहे.

आेबामा यांचे रविवारी येथे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांची या वेळी उपस्थिती होती. दोनदिवसीय परिषदेत जी-७ संघटनेचे नेते विविध मुद्द्यांवर चर्चा करतील. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची गैरहजेरी रविवारी स्पष्टपणे जाणवत असतानाच आेबामा यांनी परिषदेच्या सदस्य राष्ट्रांना एकत्र येऊन रशियाच्या विरोधात मोहीम सुरू करण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर जर्मनीसोबतची देशाची मैत्री जगातील सर्वात बळकट आघाडींपैकी एक असल्याचे त्यांनी सांगितले. मर्केल यांनीदेखील अमेरिकसोबतच्या संबंधाचा उजाळा दिला.

अनेक मुद्द्यांवर अमेरिकेसोबत आमचे मतभेद जरूर आहेत; परंतु अमेरिका आमच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा भागीदार आहे, असे मर्केल यांनी आपल्या भाषणात मान्य केले. त्याचबरोबर दोन्ही देश समान मूल्ये जोपासतात. क्रुएन या छोट्या शहरात आयोजित एका कार्यक्रमात रविवारी आेबामा आणि मर्केल बाेलत होते.
बातम्या आणखी आहेत...