आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Obama Take Emergency Meeting After The Parrise Terror Attack

अमेरिकाही धास्तावली; सुरक्षेत वाढ, आेबामांची तातडीची बैठक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बैठकीनंतर तुर्कीच्या अंटेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आेबामा यांचे आगमन झाले.
वॉशिंग्टन- इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या फ्रान्समधील रक्तपातानंतर अमेरिकादेखील धास्तावली आहे. म्हणूनच राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा यांनी आशिया दौऱ्यापूर्वी सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तचर विभागाची महत्त्वपूर्ण बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
आेबामा यांचा तीनदिवसीय आशियाचा दौरा सुरू झाला. परंतु त्याअगोदर रवाना होण्यापूर्वी आेबामा यांनी ही बैठक घेतली. हल्ल्याची जबाबदारी आयएसने घेतली आहे. परंतु त्याबद्दल काही विरोधाभासी माहिती आपल्याकडे आहे का, याची पडताळणीदेखील बैठकीतून करण्यात आली, असे व्हाइट हाऊसच्या सूत्रांनी सांगितले. गुप्तचर विभागाकडे उपलब्ध माहितीचे विश्लेषण या बैठकीत करण्यात आले. त्याचबरोबर अमेरिकेला तूर्त तरी आयएसच्या हल्ल्याचा कोणत्याही प्रकारे धोका नसल्याचे या आढाव्यातून स्पष्ट झाले. अमेरिकेतील नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्व त्या उपाययोजना करण्यात येत असल्याची खातरजमा आेबामा यांनी करून घेतली. फ्रान्सच्या यंत्रणेसोबत संवाद आणि सहकार्य वाढवण्याची सूचनाही त्यांनी केली. त्याशिवाय पॅरिसमधील राजदूत कार्यालयाच्या सुरक्षेसाठी योग्य ती उपाययोजना करण्याचे आदेशही आेबामा यांनी अधिकाऱ्यांना दिले.

तोडगा नाहीच : अनेक देश एकत्र येत आहेत. परंतु नजीकच्या काळात तरी दहशतवाद्यांचे संपूर्ण उच्चाटन होणे अशक्य दिसते, असे संरक्षणविषयक विश्लेषक अँथोनी कॉर्ड‌्समन यांनी म्हटले.

नाटो सक्रिय होणे अपेक्षित
नाटोने आता सक्रिय होण्याची वेळ आली आहे. अतिशय काटेकाेरपणे रणनीती आखली गेली पाहिजे. त्यानंतरच आयएसचा नायनाट करता येऊ शकेल.
जेम्स स्टाव्हरिडिज, माजी टॉप कमांडर, नाटो.

बाॅम्बपेक्षा लष्करी कारवाई वाढण्याची शक्यता
पॅरिस हल्ल्यानंतर अमेरिका दहशतवादविरोधी लष्करी कारवाईत आणखी वाढ करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इराक आणि सिरियात इस्लामिक स्टेटविरोधात मोठ्या प्रमाणात हवाई कारवाई सुरू आहे. त्याचे स्वरूप आणखी व्यापक होऊ शकते. बॉम्ब टाकून सामान्य नागरिकांना संकटात टाकण्यापेक्षा आयएसवर लष्करी कारवाईवर भर दिला जाऊ शकतो. आयएसविरोधातील लढाईत अमेरिका अधिक सक्रिय होईल.