आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओबामा: तरुण उद्योगपतींना सरकारने कशी मदत करावी, जॅक मा उत्तरले कर बंदच करा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परिषदेत जॅक मांची मुलाखत घेताना ओबामा.
मनिला- अमेरिकेचे अध्यक्षबराक ओबामांनी सर्वांना चकित केले. मनिलात आशिया पॅसिफिक आर्थिक सहकार्य परिषद सुरू होती. ओबामांचे सत्र संपले होते. त्याच वेळी त्यांनी कार्यक्रमात बदल करून चीनच्या अलिबाबा डॉट कॉमचे मालक जॅक मा यांना मंचावर बोलावले आणि स्वत:च त्यांची मुलाखत घेतली. जवळपास १३ लाख कोटी रुपयांच्या कंपनीचे मालक असलेल्या जॅक मा यांनीही सर्व प्रश्नांना रंजक उत्तरे दिली. यामुलाखतीचा सारांश असा...
ओबामा: सरकार प्रस्थापित व्यापारी समूह युवा उद्योगपतींना कशी मदत करू शकतात?
जॅकमा : सरकारबाबतसांगायचे तर उत्तर खूपच सोपे आहे. युवा उद्योजकांना खूपच कमी कर लावा किंवा कर पूर्णपणे संपवा.

या उत्तरावर जॅक मा यांना परिषदेत उपस्थित उद्योगपती आणि सहभागी व्यक्तींकडून प्रचंड दाद मिळाली. त्यावरओबामाही म्हणाले - ‘पाहा,तुमच्या सूचनेला सर्व सहकाऱ्यांकडून चांगली दाद मिळाली आहे. म्हणजेच सर्वांना ते हवे आहे.’
त्यावरजॅक उत्तरले- ‘चिनीबाजारापेक्षा पुढे जाण्यास आपले प्राधान्य आहे. आम्हाला ब्राझील,रशियातही मोठी शक्यता दिसते.’

ओबामा: पॅनलमध्ये सहभागी आंत्रप्रेन्युअर प्रा. आसिया मिजेनो यांनी मिठाच्या पाण्यावर चालणारा दिवा बनवला आहे. या नवकल्पनेत तुम्ही काही गुंतवणूक कराल का?
जॅक मा : अलिबाबाकंपनीने गेल्या सहा महिन्यांत कंपनीच्या एकूण महसुलाच्या ०.३% रकमेचा उपयोग हवामान बदल पर्यावरणाशी संबंधित समस्यांवर उत्तरे शोधणाऱ्या नव्या लोकांना प्रोत्साहनासाठी केला आहे. कुठल्याही स्वच्छ तंत्रज्ञानात गुंतवणूक करणे उत्तमच.
यावरओबामा विनोदाने म्हणाले- प्रा.आसिया मिजेनो यांना तुम्ही काही मदत करू शकता का, असा फक्त सल्ला मी तुम्हाला देत आहे....’ जॅक मा यांनी त्यावर बिल गेट्स यांच्याकडे पाहत फक्त स्मितहास्य केले. कारण याच मुद्द्यावर या दोघांमध्ये काही वेळापूर्वी चर्चाही झाली होती.