आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बराक आेबामांचा मूळ गावी दौरा, केनियाला नातवाचे कौतुक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नैरोबी- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा पहिल्यांदाच पूर्वजांची भूमी असलेल्या केनियाच्या दौऱ्यावर रवाना झाले. त्यांचा हा आफ्रिकेचा आठवडाभराचा दौरा आहे. या दौऱ्यात ते तीन देशांना भेट देतील. नैरोबीहून इथिअोपियाच्या अदिस अबाबाच्या उत्तरेकडील ग्रेट रिफ्ट घाटाचे अवलोकन करतील. त्यांनी चार वेळा आफ्रिकेची वारी केली आहे. परंतु राष्ट्राध्यक्ष पदावर असताना मात्र ते पहिल्यांदाच केनियाच्या दौऱ्यावर आहेत. राजधानी नैरोबीपासून काही अंतरावरील कोगेलो हे त्यांचे मूळ गाव आहे. आेबामा यांच्या वडिलांवर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. सध्या त्यांची आजी साराह तेथे राहतात. साराह त्यांच्या आजोबांची तिसरी पत्नी होत.

आजीला उत्सुकता
आजी साराह यांना नातवाच्या आगमनाची प्रतीक्षा आहे. त्या आेबामा यांना आपल्या हातांनी खाऊ घालतील. आेबामा रेस्तराँ
गोएनामध्ये आेबामा यांच्या नावावर रेस्तराँ आहे. तेथे आेबामा आले नाहीत तरी ग्राहक आकर्षित होतात. विद्यार्थी आेबामा

कोगेलोमध्ये एक सिनेटर आेबामा प्रायमरी स्कूल आहे. विद्यार्थ्यांमध्येही आेबामा येणार असल्याने उत्साह अाहे.