आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इसिसचा ‘खात्मा’ करू : आेबामांची ग्वाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या विरोधातील लढाई ‘कठीण’ आहे; परंतु अमानुष दहशतवादी कृत्ये करणाऱ्या इसिसचा अमेरिका खात्मा केल्याशिवाय राहणार नाही.

सिरियातील कारवाई त्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाची रणनीती आहे, असे राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा यांनी म्हटले आहे. इसिससोबतची लढाई कठीण असल्याचे आेबामा यांनी पहिल्यांदाच मान्य केले आहे. परंतु अमेरिकेची मूल्ये आणि इतर घटकांच्या साह्याने त्यांचा खात्मा करण्यात यश येईल, असा विश्वास आेबामा यांनी व्यक्त केला आहे. भविष्य चांगल्या पद्धतीने घडवण्यात यावे, सुरक्षित भविष्य असावे, असा विचार करणाऱ्यांचे आम्ही कायम समर्थन करतो. ते शनिवारी साप्ताहिक कार्यक्रमात मार्गदर्शन करत होते. सिरिया आणि इराकमधील परिस्थिती अत्यंत गुंतागुंतीची झाली आहे. इसिसच्या विरोधातील सैन्याला अमेरिकेच्या जवानांची साथ मिळाली आहे. ते इसिसच्या विरोधात संयुक्त मोहीम राबवत आहेत.सिरियन डेमोक्रॅटिक फोर्स या कुर्दीश गटाने इसिसला चांगली टक्कर दिली आहे. त्याला अमेरिकेचे चांगले सहकार्य मिळते.

६६ राष्ट्रांची तगडी लष्करी आघाडी
इसिसचा पाडाव करण्यासाठी ६६ देशांची लष्करी आघाडी सक्रिय असून दिवसेंदिवस ही आघाडी बलाढ्य होत चालली आहे. त्यात अरब देशांचाही समावेश आहे. इराकमध्ये ४० टक्के भाग इसिसला सोडावा लागला आहे. त्यावर आता सरकारी नियंत्रण आहे. सिरियातही मोठ्या प्रमाणात माघार घ्यावी लागली.