आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Obama\'s Grandmother Requested Him To Adopt Muslim Religion

अमेरिकेचे राष्ट्रपती ओबामांना आजी सारा उमरने केली इस्लाम स्वीकारण्याची विनंती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - खुर्चीवर बसलेली ओबामांची आजी सारा उमर. - Divya Marathi
फोटो - खुर्चीवर बसलेली ओबामांची आजी सारा उमर.
मक्का - अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामांची आजी सारा उमरने त्यांचे नातू आणि अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांना इस्लाम स्वीकारण्याची विनंती केली आहे. सारा उमर नुकत्याच मुस्लिमांचे धार्मिक स्थळ असलेल्या मक्का येथे गेल्या होत्या. ओबामांनी राष्ट्रपती बनल्यानंतर अनेकदा आपण मुस्लीम असल्याचे नाकारले आहे. पण आता त्यांच्या आजीने त्यांना केलेल्या आग्रहानंतर पुन्हा एकदा या चर्चेला बळ मिळाले आहे.
रशिया टुडेच्या एका वृत्तानुसार 90 वर्षीय सारा उमर ओबामांच्या आजोबांच्या तिसऱ्या पत्नी आणि केनियाच्या नागरिक आहेत. त्या त्यांचा मुलगा अपने बेटे सईद ओबामा (बराक ओबामांचे काका) आणि नातू मुसा ओबामाबरोबर मक्का येथे गेल्या होत्या. त्यानंतर सौदी अरबहून प्रकाशित होणाऱ्या अलवतन वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी, आपण नातवाने इस्लाम स्वीकारावा यासाठी प्रार्थना केली असे सांगितले. अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांचे वडील ओनयांगू हुसेन ओबामा केनियन मुसलमान होते तर त्यांची आई अॅन डनहम अमेरिकेची होती. ओबामांनी मात्र अनेकवेळा आपण ख्रिश्चन असल्याचा दावा केला आहे. पण अजूनही अमेरिकेच्या नागरिकांत त्यांच्या धर्माच्या मुद्यावरून संभ्रम आहेत. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये जालेल्या एका सर्वेक्षणात अमेरिकेच्या 18 टक्के नागरिकांनी ओबामा मुस्लीम असल्याचे म्हटले तर, 34 टक्के नागरिकांनी त्यांना ख्रिश्चन म्हटले होते.

अल अरेबिया न्यूजच्या वृत्तानुसार सारा ओबामा मोहम्मद पैगंबर यांच्याशी संबंधित एका प्रदर्शनातही गेल्या होत्या. हे प्रदर्शन वैज्ञानिक आणि खऱ्या दस्तऐवजांद्वारे आधुनिक पद्धतीने इस्लामचा प्रसार करण्याचे एक चांगले उदाहरण असल्याचे त्या यावेळी म्हणाला. या माध्यमातून इस्लामबाबतचे गैरसमज दूर होण्यास मदत होऊ शकेल, असेही त्या म्हणाल्या.

सारा यांनी 2009 मध्ये बराक यांचे भाऊ ओबोंगो 'रॉय' ओबामा बरोबर वॉशिंग्टन डीसीचा दौराही केला होता. ओबोंगो Luo activist आणि कट्टर मुस्लिम आहेत. ओबामांचे लहान भाऊ सॅमसन यांच्यावर त्यांच्यावर असलेल्या लैंगिक छळाच्या आरोपावरू ब्रिटन सरकारने एकदा देशात प्रवेश द्यायला नकार दिला होता.

पुढील स्लाइडवर पाहा, कुटुंबाबरोबरचे ओबामांचे PHOTO