आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सम-विषम’शिवायही समस्येवर उपाय शक्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिस्बेन (आॅस्ट्रेलिया) - दिल्ली सरकारने सुरू केलेल्या सम-विषम पथदर्शी प्रकल्पानंतर मध्य प्रदेश, महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी त्यात रस दाखवला आहे; पण ही पद्धत न वापरताही रस्त्यावर वाहनांची संख्या कमी केली जाऊ शकते आणि लोकांना सार्वजनिक वाहतूक यंत्रणेकडे आकर्षित केले जाऊ शकते. याचे उदाहरण म्हणजे ब्रिस्बेन. येथे सकाळी व सायंकाळी निश्चित वेळेसाठी बस लाइनमध्ये इतर वाहनांना प्रवेश नसतो. त्यामुळे बसेस वेगात जाऊ शकतात. तो बस रॅपिड ट्रान्झिट रुटप्रमाणे (बीआरटी) वापरला जाऊ शकतो. त्यासाठी रस्त्यावर वेगळे बांधकाम केले जात नाही.

कॅमेऱ्यांद्वारे संपूर्ण शहरावर नजर ठेवली जाते. लोकही त्याचे पालन करतात. लोकांना अडचण येऊ नये म्हणून प्रत्येक मार्गावर १५ मिनिटांनी एक बस येते. बस मार्गावरील एखाद्या बसमध्ये गर्दी असेल तिच्यावर ‘माफ करा, ही बस भरलेली आहे,’ असे लिहिलेले असते. त्याची माहिती नियंत्रण कक्षापर्यंत जाते आणि तेथून अशा मार्गावर जास्त बस चालवल्या
जातात. प्रत्येक थांब्यावर तेथून जाणाऱ्या प्रत्येक बसची माहिती, दोन बसमधील वेळ आणि बसच्या दिवसभरातील फेऱ्या यांची माहिती असते. त्यामुळे कोणत्या मार्गावर दिवसभरात किती बस येतील, याची माहिती मिळते.

बसचा मार्ग सर्व बाजार, कार्यालयांशी जोडण्यात आला आहे. जेथे जागा नाही तेथे बस भुयारी मार्गाने पोहोचवली जाते. व्यग्र भागातही बस पोहोचावी हा उद्देश. शहरातील प्रत्येक भागात बस पोहोचावी, अशी व्यवस्था आहे. त्याचबरोबर प्रत्येक भागाला जोडण्यासाठी एक रिंग रेल्वे नेटवर्कही आहे. ते शहरात अनेक ठिकाणी बस थांब्याजवळ अाहे. तेथून रेल्वे स्थानकापर्यंत पायीही जाता येते. बस आणि रेल्वेस्थानके जोडलेलीच आहेत.

या सर्व कारणांमुळे येथील लाखो लोक आपल्या वाहनांचा किमान वापर करते. त्याशिवाय शहरात अनेक ठिकाणी भाड्याच्या सायकलींचे स्टँडही तयार केले आहेत. तेथून बस थांबा किंवा रेल्वे स्थानकापर्यंत भाड्याने सायकल घेता येते. स्थानकाशेजारीच असलेल्या स्टँडवर सायकल लावता येते.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणाऱ्या नागरिकांची संख्या २२ लाखांच्या घरात आहे. त्यातून यंत्रणेवरील विश्वासही दिसतो.
फोटो - वाहने कोणत्या मार्गे जातील हे लिहिलेले साइन बोर्ड.