आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॅशनच्या जगात वृद्ध महिलांचेही वर्चस्व

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अशा परिपक्व स्त्रियांची काही कमी नाही ज्यांना माहिती आहे की, भडक लिपस्टिक आणि चांगला स्कार्फ वापरल्याने जगावर प्रभाव पाडता येतो. ९३ वर्षांच्या आइरिस अ‍ॅपफेल मनगटापासून ते कोपरापर्यंत मोठे ब्रेसलेट्स परिधान करतात. त्यांच्या गळ्यात नाजूक नक्षीकाम केलेले हार असतात. डोळ्यांवर काळ्या फ्रेमचा मोठा चष्मा असतो. फॅशन वॉचर त्यांना दुरूनच ओळखतात. आइरिस यांच्या आकर्षक स्टाइल आणि जीवनावर माहितीपट तयार झाला आहे. तो एप्रिल महिन्याच्या शेवटी न्यूयॉर्कमध्ये प्रसिद्ध होणार आहे.

आइरिसने पती कार्लसोबत इंटेरिअर डेकोरेशन कंपनी ओल्ड वर्ल्ड वीव्हर्स सुरू केली. कंपनीने राष्ट्राध्यक्ष आइजनहॉवर ते बिल क्लिंटनपर्यंतच्या कार्यकाळात व्हाइट हाऊसची सजावट केली.

आइरिस यांच्या माहितीपटासाठी यापेक्षा चांगला काळ कुठलाच राहिला नसता. चमकदार हाय फॅशन ते सोशल मीडियापर्यंत वृद्ध महिला स्टाइल, सौंदर्य आणि ग्लॅमरमुळे चर्चेत आहेत. फॅशनच्या जाहिरातींमध्ये प्रौढ सौंदर्याचा बोलबाला आहे. ६९ वर्षांच्या हेलन मिरेन एल ओरियल युकेचा चेहरा आहे. त्या नवीन चित्रपट वुमन इन गोल्डमध्येही आहेत. नार्स कॉस्मेटिक्सच्या जाहिरातीत ६९ वर्षीय अभिनेत्री चार्लोट रेम्पलिंग जलवा दाखवत आहेत. ६६ वर्षांच्या जेसिका लांगे मार्क जेकब्सच्या मॉडेल आहेत. फॅशन लेबल सेलिनेच्या नवीन जाहिरातीत ८० वर्षीय लेखिका जोआन डिडिऑन दिसतात. ७१ वर्षीय गायिका, गीतकार जोनी मिशेल वेस सेंट लारेंटच्या वर्तमानपत्रांमध्ये पहायला मिळतात.

कार्मेन डेल ओरेफिसयांशिवाय वृद्ध मॉडेल्सची यादी अर्धवट आहे. ८३ वर्षांच्या डेलला जगातील सर्वात वृद्ध सुपर मॉडेलचा किताब मिळू शकतो. डेलचे चांदीसारखे चमकणारे केस व गालांवर दिसणारी हाडे त्यांच्या वार्धक्यातील ग्लॅमरची स्तुती करतात. वृद्ध पुरुषांत फॅशनबाबत उत्साह दिसत नाही. ज्या जाहिरातीत जोडपे असते, त्यात पुरुषांना संधी मिळते. फॅशन इंडस्ट्रीला प्रौढांच्या स्टाइलचे महत्त्व उशिरा कळले. महागड्या वस्तू कोण खरेदी करू शकते हे लक्षात आले. अ‍ॅपफेलच्या म्हणण्यानुसार, तरुणांना आकर्षित करण्यात यश आले आहे. मात्र, त्यांच्याकडे पैसे नाहीत.

कपड्यांवर सर्वात जास्त खर्च
अमेरिकेच्या ब्युरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्सनुसार ५५ ते ६४ वर्षांच्या महिला कपड्यांवर सर्वाधिक खर्च करतात. त्याच्या खालोखाल ६५ते ७४ वर्षांच्या महिला खरेदी करतात.