आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकेत शीख व्यक्तीवर हल्ला, हल्लेखोराने लादेन-दहशतवादी म्हणून संबोधले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जखमी इंदरजित सिंग मुक्कर. - Divya Marathi
जखमी इंदरजित सिंग मुक्कर.
न्यूयॉर्क - अमेरिकेत भारतीय वंशाच्या एका ज्येष्ठ शीख व्यक्तीवर वर्णद्वेशी हल्ल्याचा प्रकार समोर आला आहे. इंदरजित सिंग मुक्कर असे त्यांचे नाव असून मारहाण करण्याबरोबरच त्यांना दहशतवादी आणि ओसामा बिन लादेन असेही म्हटले गेले.

शिखांच्या एका संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी शिकागोमध्ये घडली. अमेरिकेत 9/11 हल्ल्याच्या स्मृतीदिनाचा कार्यक्रम सुरू होता. त्यावेळी इंदरजित हे आपल्या घरातून दुकानाकडे जात होते. त्याचवेळी एका कारस्वाराने त्यांना दहशतवादी आणि बिन लादेन असे म्हणत आवाज गिला. एवढेच नाही तर त्याने इंदरजितला आपल्या देशात परतण्याचा इशाराही दिला. यावेळी त्याने इंजरजित यांच्या कारला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. इंदरजित यांनी त्याला पुढे जाता यावे म्हणून कार रस्त्याच्या बाजुला घेतली. पण त्याने इंदरजित यांच्या कारसमोर काल लावली आणि इंदरजित यांना कारमधून बाहेर काढले. त्यानंतर त्याने त्यांना एकच मारहाण सुरू केली. त्या मारहाणीमुळे इंदरजित बेशुद्ध झाले आणि त्यांच्या चेहऱ्यातून रक्तस्राव सुरू झाला होता. त्यांच्या चेहऱ्याचे एक हाडही फ्रॅक्चर झाले. नंतर त्यांना रुग्णालायत दाखल करण्यात आले. त्याठिकाणी डॉक्टरांना त्यांच्या चेहऱ्यावर सहा टाके द्यावे लागले.

हल्लेखोर अटकेत
पोलिसांनी या प्रकरणी संशयित हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे. शीख संघटनेच्या लीगल डायरेक्टर हरसिमरन कौर यांनी सांगितले की, इंदरजित यांच्यावर धर्म, देश आणि वर्ण याच्या आधारावर हल्ला करण्यात आला. आम्ही लोकल आणि फेडरल एजन्सीला या प्रकरणाची चौकशी हेट क्राइम म्हणून करावी अशी विनंती केली आहे.

शिखांना केले जाते लक्ष्य...
शिखांवर हल्ला करण्याचा हा पहिला प्रकार नाही. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात संदीप सिंग नावाच्या व्यक्तीला 30 फुटांपर्यंत ओढत नेण्यात आले होते. तसेच त्यालाही ददशतवादी संबोधण्यात आले होते. तसेच 2012 मध्ये विस्कोन्सिनच्या ओक क्रीकमध्ये एका गनमॅनने गुरूद्वाऱ्यात घुसून सहा जणांची हत्या केली होती.