आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • OMG : Male Belly Dancers Are All The Rage In Turkey These Days

VIDEO : महिलांचे कपडे घालून पुरुष असा करतात Belly Dance

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरात बहुतांश भागामध्ये बेलीडान्स महिला करत असतात. साधारणपणे या नृत्यप्रकाराशी पुरुषांचा काही संबंध नसतो. पण तुर्कस्तानमध्ये पुरुष बेली डान्सर्सही मनोरंजन करत असल्याचे दिसून येते. त्यांना 'जिनस' म्हणून ओळखले जाते. लोकही त्यांना चांगलीच दाद देतात. विशेष म्हणजे महिलाही त्यांच्यावर पैसे उधळतात.
फोटो - बेली डान्स करणारा तरुण

हे बेली डान्सर्स जेव्हा डान्स करतात तेव्हा ते महिलांच्या वेशात असतात. एवढेच नाही तर ते हाव भावही महिलांसारखेच करत असतात. टर्किश गाण्यावर सुरेख असे नृत्य ते सादर करत असतात. पुरुषांनी डान्स करण्यास गेल्या काही दिवसांत सुरुवात केलेली नाही तर ही शेकडो वर्षांची परंपरा आहे.

600 वर्षे जुनी परंपरा
टर्कीच्या सुलतानाच्या आदेशावर हा प्रकार सुरू झाला होता. कारण त्यावेली मुस्लीम महिलांना असे सादरीकरण करण्यास परवानगी नव्हती. पण 600 वर्ष जुनी ही परंपरा आता महिला तोडताना दिसत आहेत. त्यामुळे या ठिकाणी आता महिला बेली डान्सर्सही आढळतात. त्यामुळे पुरुष डान्सर्सचे अस्तित्व धोक्यात आले होते. या डान्सर्सना पार्ट्या, क्लबसाठीही आमंत्रित केले जाते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, या डान्सचे काही PHOTOS आणि अखेरच्या स्लाइडवर पाहा VIDEO