आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिद्दीला सलाम: ९६ व्या वर्षी १०० मीटर अंतर २३ सेकंदांत पूर्ण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - जिद्द असेल तर जगातील काेणतेही काम कठीण असू शकत नाही. लंडनचे डॉक्टर चार्ल्स युस्टर यांनी ही बाब स्पष्ट केली. ९६ वर्षांच्या धावपटूने जणू आपल्या वयाला पिछाडीवर टाकत १०० मीटर आणि २०० मीटरच्या शर्यतीत देशात नवीन विक्रम आपल्या नावावर नोंदवले.
ब्रिटनच्या बर्मिंगहॅमच्या अलेक्झांडर स्टेडियममध्ये ब्रिटिश मास्टर्सच्या एम-९५ कॅटेगरीमध्ये १०० मीटरचे अंतर २३.७८ सेकंदांत पूर्ण केले. त्यांनी २५ जुलै रोजी हा विक्रम प्रस्थापित केला. त्यांनी २०० मीटरचे अंतर ५७.२७ सेकंदांत पूर्ण करून आपल्याच नावावरील विक्रम मोडीत काढला. दातांचे डॉक्टर राहिलेल्या चार्ल्स यांच्या मते माझ्या वयातील कोणत्याही व्यक्तीने यापूर्वी असा प्रयत्न केलेला नाही. खरे तर माझ्यासाठी ही गोष्टी खूप कठीण होती. मी आपल्या कामगिरीवर खूप समाधानी आहे. चार्ल्स यांच्या निवासस्थानातील एक संपूर्ण हॉल पदकांनी भरलेला आहे. वास्तविक धावण्याच्या शर्यतीत सहभागी होण्यास चार्ल्स यांनी गेल्या वर्षापासूनच सुरू केले आहे. आता त्यांची नजर या महिन्यात होणाऱ्या लिआेन येथील जागतिक स्पर्धेवर आहे.

८७ व्या वर्षी नवीन छंद
चार्ल्स यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी बॉडी बिल्डिंग करण्यास सुरुवात केली होती. कामात शिस्त, पोषणमूल्यांचा समावेश असलेले भोजन, व्यायाम अशा जीवनशैलीवर त्यांचा भर असतो. शारीरिक तंदुरुस्तीसाठी ते जगभ्रमंतीवर विश्वास ठेवतात.

महाराणींकडून मिळाली तंदुरुस्तीची प्रेरणा
तंदुरुस्त राहण्याची प्रेरणा अॅथलिटकडून मिळालेली नाही. महाराणी एलिझाबेथ याच माझी प्रेरणा आहेत. ९० वर्षांहून अधिक वय असतानाही त्या निवृत्त झालेल्या नाहीत. त्यादेखील आपल्या दिनचर्येचे काटेकोरपणे पालन करतात. त्यांनी सर्वांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे; परंतु मी निवृत्त झालो तर कधीही न संपणाऱ्या सुट्या सुरू होतील. ही गोष्ट मला भयानक वाटू लागते. म्हणूनच लोकांनी आपली तंदुरुस्ती राखण्यासाठी त्यासंबंधी जाणून घेतले पाहिजे. त्यामुळे तुम्ही कधीही वृद्ध होणार नाहीत.
छायाचित्र: शर्यतीत धावताना डॉ. चार्ल्स युस्टर
बातम्या आणखी आहेत...