आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंधराव्या वर्षीच घर सोडले, पेपर विकले, आता १० हजार कोटींच्या कंपनीचे मालक!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - अंबरीशचा जन्म कोलकात्याचा. बालपण धनबादेत गेले. बिझनेसची कल्पना दिल्लीत सुचली. लंडनमध्ये कंपनी सुरू केली. केवळ ५ वर्षांत अंबरीश १० हजार कोटींच्या ब्लिपर या कंपनीचे मालक आहेत. १७० देशांंत तिचे ६.५ कोटी युजर्स आहेत. अंबरीश यांची कहाणी स्लमडॉग मिलेनियरसारखीच आहे. त्यांचे पूर्ण नाव आहे अंबरीश मित्रा. त्यांना रिश असेही संबोधले जाते.

शाळेत अंबरीशचे मन कमी लागायचे. मुलाने इंजिनिअर व्हावे, ही वडिलांची इच्छा. मात्र अंबरीशला संगणक प्रिय. शेवटी त्यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्याचे वय १५ वर्षे होते. ‘मुंबईला जात आहे. पण हीरो बनण्यासाठी नाही,’ असे वडिलांच्या नावे लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी म्हटले होते.
पण रस्त्यात विचार बदलला. ते दिल्लीला गेले. तेथे एका झोपडपट्टीत जागा मिळवली. खर्च भागवण्यासाठी अंबरीश पेपर विकत. हॉटेलमध्ये काम करत. एके दिवशी पेपरमध्ये जाहिरात पाहिली. तिच्यात बिझनेसची कल्पना मागवली होती.५ लाखांचे बक्षीस होते. अंबरीशनी महिलांना मोफत इंटरनेट देण्याची कल्पना दिली. तिला बक्षीस मिळाले. त्यातूनच अंबरीशने ‘वुमेन इन्फोलाइन’ सुरू केली.
आता ३७ वर्षीय अंबरीश म्हणतात, ‘तेव्हा मी चांगला लीडर नसल्याने कंपनी नफ्यात नव्हती. २००० मध्ये कंपनी सोडली. इंग्लंडला जाण्याचा निर्णय घेतला. तेथे टेक्नॉलॉजी कंपनी सुरू करायची होती, पण जमले नाही. होते ते पैसे खर्च झाले. दरम्यान दारूची सवय लागली. एक दिवस लंडनच्या एका पबमध्ये उमर तय्यब (ब्लिपरचे सहसंस्थापक) या मित्रासोबत बसलो होतो.
शेवटच्या पेगसाठी मी काउंटरवर १५ डॉलर ठेवले व गमतीने म्हणालो, नोटांमुळे महाराणी एलिझाबेथ बाहेर आली असती तर किती बरे झाले असते? ही गंमतच बिझनेस कल्पना बनली. उमरने माझा फोटो घेतला आणि तो महाराणीच्या फोटोसोबत सुपर इंपोज केला. मग आम्ही हा अॅप डेव्हलप करण्याचा विचार केला आणि अशा प्रकारे ‘ब्लिपर’ कंपनीचा जन्म झाला.

पुढील स्लाईडवर वाचा.... अंबरीश यांच्या कंपनीचे १७० देशांत ६.५ कोटी यूजर्स
बातम्या आणखी आहेत...