आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारच्या धर्तीवर आता बाइकसाठीही एअरबॅग, फ्रेंच स्टार्ट-अॅपची एअरबॅग क्रांती, मोटारसायकल चालकांच्या सुरक्षेसाठी एअरबॅग वेस्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लास वेगास (अमेरिका)- आता दुचाकीस्वारांच्या सुरक्षेसाठीही एअरबॅगचा उपयोग होणार आहे. ही सामान्य कपड्यांवर जॅकेटप्रमाणे घातली जाऊ शकते. मात्र, कारमध्ये वापरल्या जाणाऱ्या एअरबॅगच्या तुलनेत ती बरीच स्मार्ट आहे. हिचे वैशिष्ट्य म्हणजे एखाद्या इमर्जन्सी कॉल सर्व्हिसप्रमाणे काम करू शकेल, अशा स्मार्टफोनसोबत ती जोडली गेली आहे. एअरबॅग वेस्ट बनवणाऱ्या फ्रेंच स्टार्टअप कंपनीने बुधवारी पहिल्यांदा लोकांसमोर तिचे सादरीकरण केले. तिचा यशस्वी वापरही करून दाखवण्यात आला.
  
एअरबॅग निर्मात्या कंपनीचे पेरी फ्रान्सिस टिसॉट म्हणाले, एअरबॅग वेस्टच्या आतमध्ये इन एंड बॉक्स नावाचे उपकरण लावण्यात आले असून तो पूर्ण प्रणालीच्या मेंदूच्या रूपात काम करतो. त्यात लावलेले सेन्सर्स दुचाकी चालवताना चालकाच्या हालचालीची नोंद घेत संभाव्य अपघाताचा इशारा देण्यासही सक्षम आहेत. अपघात झाल्यावर ही एअरबॅग १०० मिली सेकंदाच्या आत उघडून चालकाचा जीव वाचवण्यात सक्षम आहे. याशिवाय कोणत्याही अपघाताच्या तीन मिनिटांपर्यंत चालकाच्या शरीराची हालचाल न झाल्यास स्मार्टफोनसोबत जोडलेल्या फोनमध्ये बसवलेल्या इमर्जन्सी क्रमांकावर अलर्ट पाठवते. चालकाचे खांदे, छाती आणि मणक्याची सुरक्षा व्हावी या दृष्टीने बॅगचे डिझाइन केले आहे. या जॅकेटच्या पुढच्या भागात चिप दिली आहे. त्यामुळे एअरबॅग काढताना आणि घालताना अडचण येत नाही.
  
दुचाकी अपघातांमुळे होणारे मृत्यू कमी करणे आणि त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कंपनीने “एअरबॅग रिव्हॉल्युशन’ नावाने मोहीम चालवली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या माेहिमेत सहभागी होणाऱ्या सुरुवातीच्या ५०० जणांना दोन ते तीन महिन्यांच्या आत एअरबॅग मोफत दिली जाईल. कंपनीने सध्या याची किंमत ठरवली नाही. एअरबॅग बाजारात कधी येणार, ती कशी मिळेल याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
बातम्या आणखी आहेत...