आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ओबामा कन्येला लग्नाची ऑफर, ५० गाई, 70 मेंढ्या देण्याची दाखवली तयारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - सेलिब्रिटीजना अनेकदा काही अजब गोष्टींचा सामना करावा लागतो. नटनट्यांना लग्नाची मागणी घालणाऱ्यांची संख्या तर खूपच आहे. मात्र, अशाच एका प्रस्तावाचा सामना खुद्द अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांना करावा लागला आहे. केनियातील एका वकिलाने चक्क ओबामांच्या मुलीस मागणी घातली आहे आणि बदल्यात ओबामांना ५० गाई, ७० मेंंढ्या आणि ३० बकऱ्या देण्याचा प्रस्ताव दिला आहे. फेलिक्स किपरोनो असे या वकिलाचे नाव असून तो केनियाची राजधानी नैरोबीत वकील आहे.

नैराेबीच्या एका वृत्तपत्राने किपरोनोने ओबामांना दिलेल्या प्रस्तावाचे वृत्त प्रकाशित केले आहे. या वृत्तात किपरोनोचे वय सांगण्यात आलेले नाही. मात्र, मागील कित्येक वर्षांपासून तो ओबामा यांची कन्या मालियाशी लग्न करण्याचे स्वप्न पाहत असल्याचा उल्लेख केलेला आहे.

मालियाला पारंपरिक स्वयंपाक शिकवणार
किपरोनो हा केवळ लग्नाच्या मागणीपुरताच थांबलेला नाही, तर त्याने मालियासोबत सुखी संसाराची स्वप्नेही पाहायला सुरुवात केली आहे. तो म्हणतो, मालियावर माझे खरे प्रेम आहे. मी तिच्या वडिलांच्या संपत्ती किंवा पदाला पाहून तिच्यावर प्रेम करत नाही. आमचे लग्न झाल्यानंतर सामान्य पती-पत्नीप्रमाणे आम्ही राहू. मालियाला गायीचे दूध काढायला तसेच सामान्य केनियन महिलेप्रमाणे पारंपरिक स्वयंपाक बनवायलाही शिकवेन. मी ही गोष्ट माझ्या कुटुंबीयांना सांगितली असून त्यांनी माझ्या प्रस्तावास होकार दिला आहे, असेही किपरोनोने वृत्तात म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...