आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चक्रीवादळात 10 लाख कार बुडाल्या, किड्याप्रमाणे पाण्यावर अशा तरंगत होत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ह्यूस्टन शहरात मागील चार-पाच दिवसात पाण्यात अंदाजे 10 लाख कार्स डुबल्या आहेत. - Divya Marathi
ह्यूस्टन शहरात मागील चार-पाच दिवसात पाण्यात अंदाजे 10 लाख कार्स डुबल्या आहेत.
इंटरनॅशनल डेस्क- अमेरिकेच्या टेक्सास स्टेटमध्ये धडकलेल्या ‘हार्वे’ चक्रीवादळामुळे सर्वात जास्त नुकसान ह्यूस्टन शहराचे झाले आहे. आतापर्यंत एक लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणांवर पोहचवले आहे. चक्रीवादळामुळे उद्धवस्त झालेले ह्यूस्टनमधील अनेक भागांत अधिकारी घरो-घरी जात लोकांना पुन्हा महापूर येणार असल्याचा इशारा देत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ह्यूस्टनमध्ये महापूरामुळे 20 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. तसेच एका परिवारातील 6 लोक बेपत्ता आहेत. तर, 40 हजारांहून बेघर आहेत. महापूरामुळे शहराचे खूप आर्थिक नुकसान झाले आहे. मागील चार-पाच दिवसात पाण्यात अंदाजे 10 लाख कार्स डुबल्या आहेत.
 
- अमेरिकेतील चौथ्या क्रमांकाचे शहर ह्यूस्टनमध्ये शनिवारी रिकार्ड 30 इंच पाऊस पडला आहे. 
- ह्यूस्टनमधून सुमारे 35 मैल दक्षिण पश्चिम स्थित फोर्ट बेंड काउंटीत 50,000 हून अधिक लोकांना सुरक्षित स्थानावर पोहचवले आहेत.
- हार्वेतील मागील सहा दशकातून अमेरिकेतील सर्वात पॉवरफुल वादळ ठरले आहे. वर्ष 2005 मध्ये कॅटरीना वादळाने 1,800 लोकांचा मृत्यू झाला आहे. 
- 9 दिवसापूर्वी आलेले हार्वे वादळ टेक्सासपासून दूर जात आहे. मात्र, पश्चिम ह्यूस्टन भागात अजूनही थांबून थांबून पाऊस पडत आहे. 
- बचाव पथकाचे अधिकारी लोकांना अपील करत आहेत की, वादळाचा धोका अजून कायम आहे. धोका टाळण्यासाठी वीज बंद करण्यात आली. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, ह्यूस्टन शहराचे कसे झालेत हाल....
बातम्या आणखी आहेत...