आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिरियातील संघर्षात २ लाख ३० हजार ठार, ११ हजार मुले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
बैरुत - सिरियातील संघर्षात २ लाख ३० हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा बळी गेला असून यात ११ हजार ५०० मुलांनी प्राण गमावल्याचे ब्रिटन येथील मानवी हक्क आणि देखरेख गटाने मंगळवारी सांगितले.

मृतांमध्ये ६९,४९४ नागरिक, ११ हजार ४९३ मुले आणि ७ हजार ३७१ महिलांचा समावेश आहे. सरकारी फौजांच्या ४९ हजार १०६ तर ३६ हजार ४६४ सरकार समर्थक मृतांमध्ये आहेत. सरकारी फौजांनी स्थानिक बंडखोरांना ठार केले. याशिवाय लेबनॉनची शिया चळवळ हिजबुल्हाहचे ८३८ आणि अन्य देशांतील ३,०९३ शिया जवानांचा समावेश आहे. सिरियन जिहादी, कुर्दीश जवान आणि बंडखोर मिळून ४१ हजार ११६ जण ठार झाले.
संघर्षात मृत्युमुखी पडलेल्या ३,१९१ जणांची ओळख पटली नाही. सिरियामध्ये मे महिना रक्तरंजित ठरला. या महिन्यात ६ हजार ६५७ जण ठार झाले. बळींच्या संख्येत अटकेनंतर बेपत्ता २० हजार, सरकारच्या ताब्यातील ९ हजार आणि आयएसच्या ताब्यातील ४ हजार नागरिकांचा समावेश नाही. संघर्षानंतर हजारो लोक बेपत्ता झाल्याचे देखरेख
गटाने म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...