आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा सद्दाम हुसेनविरुध्‍द अमेरिकेसह 38 देशांनी मिळून छेडले होते युध्‍द

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
4 नोव्हेंबर, 1990 - इराकला प्रत्युत्तर देण्‍यासाठी सौदी अरेबियाच्या वाळवंटात तैनात अमेरिकेचे फर्स्ट कॅव्हलरी डिव्हिजनचे जवान. - Divya Marathi
4 नोव्हेंबर, 1990 - इराकला प्रत्युत्तर देण्‍यासाठी सौदी अरेबियाच्या वाळवंटात तैनात अमेरिकेचे फर्स्ट कॅव्हलरी डिव्हिजनचे जवान.
अमेरिकेने 16 जानेवारी 1991 मध्‍ये इराकविरुध्‍द 'ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म'ची सुरुवात केली होती. ऑगस्ट 1990 मध्‍ये इराकचा हुकूमशहा सद्दाम हुसेनने कुवेतवर हल्ला केला. त्यावेळी अमेरिकेसह 38 देशांनी त्याच्याविरुध्‍द युध्‍द पुकारले. या युध्‍दाला गल्फ युध्‍दाने ओळखले जाते.
कुवेतमधून दीड लाख भारतीयांना बाहेर काढले गेले...
- या युध्‍दाच्या दरम्यान भारताने 'ऑपरेशन एअरलिफ्ट' मध्‍ये कुवेतमधून दीड लाख भारतीयांना सुरक्षितरित्या मायदेशी आणले आहे.
- यावर आधारित अक्षय कुमारचा चित्रपट 'एअरलिफ्ट' 22 जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे.
इराकने शेवटी कुवेतविरुध्‍द का छेडले होते युध्‍द ?
- इराण आणि इराक दरम्यान 1980 पासून चालू आठ वर्षांच्या युध्‍दात सहभागी असल्याने कुवेतला गल्फ युध्‍दाला सामोरे जावे लागले होते.
- इराणशी युध्‍दासाठी कुवेतने इराकला बरीच आर्थिक मदत केली होती
- युध्‍द संपल्यानंतर इराक कर्जात बुडाला होता. कर्जमाफी करावी अशी मागणी इराकने कुवेतकडे केली.
- कर्जमाफीवर संमती न झाल्याने इराकने कुवेत हल्ला केला.
गल्फ युध्‍दाचा घटनाक्रम...
2 ऑगस्ट 1990 - इराकने कुवेतवर हल्ला केला. त्यावेळी इराकची सत्ता सद्दाम हुसेनच्या हातात होती.
2 ऑगस्ट, 1990 - संयुक्त राष्‍ट्राने ठराव संमत करुन कुवेतवरील इराकच्या हल्ल्याचा निषेध केला.
6 ऑगस्ट, 1990 - संयुक्त राष्‍ट्राने इराकवर अनेक निर्बंध लादले.
7 ऑगस्ट, 1990 - अमेरिकेचे अध्‍यक्ष जॉर्ज एच.डब्ल्यू बुशने ऑपरेशन डेझर्ट शील्ड सुरु करण्‍याचा आदेश दिला.
8 ऑगस्ट, 1990 - इराकने कुवेतवर ताबा मिळवून तो आपला भाग असल्याचे घोषित केले.
इराकविरुध्‍द हल्ल्याची मिळाली मंजूरी
29 नोव्हेंबर, 1990 - संयुक्त राष्‍ट्राने 15 जानेवारी, 1991 नंतर इराकविरुध्‍द सैन्याचा वापर करण्‍याची मंजूरी दिली.
16-17 जानेवारी, 1991 - अमेरिका आणि सहकारी देशांनी एकत्र येऊन इराकविरुध्‍द ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्मची सुरुवात केली.
24 फेब्रूवारी, 1991 - इराकविरुध्‍द जमिनीवरुन हल्ले सुरु झाली.
27 फेब्रूवारी, 1991 - बगदाद रेडिओने घोषणा केली, की इराक संयुक्त राष्‍ट्राचा ठरावा मानले.
स्वातंत्र झाला कुवेत
27 फेब्रूवारी, 1991 - कुवेतला इराकच्या नियंत्रणातून स्वातंत्र्य मिळाले.
28 फेब्रूवारी, 1991 - इराकविरुध्‍द मित्रराष्‍ट्रांनी हल्ले थांबवले.
14 मार्च, 1991 - इराकने शस्त्रसंधी करार मान्य केला.
गल्फ युध्‍दाशी संबंधित तथ्‍य
- इराकविरुध्‍द अमेरिका आणि 38 देशांनी एक आघाडी तयार केली होती.
- मित्रराष्‍ट्रांच्या सैन्यात 28 देशांतील 6 लाख 70 हजार सैनिक सामील होते. 4 लाख 25 हजार सैन्य एकट्या अमेरिकेची होती.
- अमेरिकेच्या संरक्षण विभागच्या अंदाजानुसार, गल्फ युध्‍दा 4 हजार 130 अब्ज रुपयांचा खर्च झाला होता.
- कुवेत, सौदी अरेबिया आणि इतर अरब देशांनी युध्‍दासाठी 2 हजार 435 रुपये दिली होती.
- दुसरीकडे जर्मनी आणि जपानने 1 हजार 82 अब्ज रुपयांचा निधी दिला होता.
- सीएनएनच्या वृत्तानुसार, युध्‍दात एक लाखापेक्षा जास्त इराकचे सैनिक मारले गेले होते.
- अमेरिकेच्या 383 सैनिकांचा मृत्यू झाला होता.
पुढील स्लाइड्सवर पाहा, गल्फ युध्‍दा दरम्यानची काही छायाचित्रे...