आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्‍ट्रअध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आदेश धुडकावून लावू शकतो; कमांडर जॉन हाइटेन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॅलिफॅक्स- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प किंवा भविष्यात कोणत्याही अध्यक्षाने अण्वस्त्र हल्ल्याचा आदेश दिला तर तो धुडकावला जाऊ शकतो, असे स्पष्ट प्रतिपादन अमेरिकेच्या स्ट्रॅटेजिक कमांडचे कमांडर जॉन हाइटेन यांनी शनिवारी केले. हॅलिफॅक्स इंटरनॅशनल सेक्युरिटी फोरममध्ये  हवाई दलाचे जनरल असलेले हाइटेन म्हणाले की, अण्वस्त्र हल्ल्याचा आदेश अवैध आहे, असे सिद्ध झाले तर तो मान्य करणे बंधनकारक नाही. 


हाइटेन म्हणाले की, अशा संभाव्य परिस्थितीबाबत अध्यक्ष ट्रम्प यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. जर अशी स्थिती उद्भवलीच तर मी बेकायदेशीर हल्ला करू शकत नाही, असे मी ट्रम्प यांना सांगू शकतो. जनरल हाइटेन म्हणाले की, जर अध्यक्षांनी अण्वस्त्र हल्ला करण्याचा आदेश दिलाच तर मी त्यांना हल्ल्याचे कायदेशीर पर्याय सुचवेन. युद्धाच्या वेळी स्ट्रॅटेजिक कमांडच्या हातातच अणुबॉम्बचे नियंत्रण राहील. अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यात तणाव वाढत असून ते एकमेकांना अणुहल्ल्याच्या धमक्या देत आहेत. अशा वेळी जनरल हाइटेन यांचे हे वक्तव्य आले आहे.  

बातम्या आणखी आहेत...