आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

US गे क्लब गोळीबार: दहशतवाद्याची पत्नी म्हणाली, मला घरात डांबून ठेवायचा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उमर मतीनची एकेकाळची पत्नी सितोरा युसुफीनुसार, तिला कैद्याप्रमाणे घरात बंद केले होते. - Divya Marathi
उमर मतीनची एकेकाळची पत्नी सितोरा युसुफीनुसार, तिला कैद्याप्रमाणे घरात बंद केले होते.
वॉशिंग्टन - अमेरिकेच्या एलजीबीटी नाईट क्लबमध्‍ये झालेल्या गोळीबारमध्‍ये 53 लोक मारले गेले आहेत. हल्लेखोर उमर मतीनची एकेकाळची पत्नी सितोरा युसूफीने एक खुलासा केला आहे. यात ती म्हणते, तो वैयक्तिक आयुष्‍यात खूप हिंसक व माथेफीरु होता. विवाहानंतर त्याने मला घरात कैद केले होते. त्याला धर्माशी काही देणेघेणे नव्हते. युसूफीनुसार, गोळीबार करण्‍यामागे त्याचे धार्मिकतेऐवजी त्याचे वेडेपण जबाबदार असू शकते. डिसऑर्डरचा शिकार होता मतीन...
- युसूफीने रविवारी मीडियाला सांगितले, की मतीन मानसिकदृष्‍ट्या स्थिर नव्हता. तो बायपोलर डिसऑर्डरने त्रस्त होता.
- त्याला धर्माशी काहीही देणेघेणे नव्हते. नाईटक्लबमध्‍ये झालेल्या गोळीबारामागे धार्मिक ऐवजी जास्त जबाबदार त्याचे वेडेपणा असेल.
- युसूफीने सांगितले, की मतीनने 2009 मध्‍ये त्याची ऑनलाइन मुलाखत घेतली होती. नंतर काही काळानंतर दोघांनी विवाह केला.
- सुरुवातीला तो एक सामान्य व्यक्तीप्रमाणे दिसत असे. मात्र लवकरच त्याचे हिंसक रुप समोर येऊ लागले.
- युसूफी म्हणते, काही महिन्यांनंतर तो मला मारहाण करायला लागला. मला माहित होते, की तो मानसिक दृष्‍ट्या अस्थिर व डिस्टर्ब आहे. कारण तो स्ट्रॉड घ्यायचा याच्याशी परिचित होते.
पुढे वाचा...
> एक ओलिसाप्रमाणे ठेवले होते मला.... बघा सितोरा युसूफीचे फोटो....