आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेपाळला पुन्‍हा बसले भूकंपाचे दोन झटके; नागरिक भयभीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काठमांडू - नेपाळमध्‍ये आज (रविवार) सकाळी पुन्‍हा भूकंपाचे दोन झटके बसले. त्‍यांची तीव्रता कमी असल्‍याने जीवित हानी झाली नाही. मात्र, यामुळे नागरिक प्रचंड भयभीत झाले आहेत.

रविवारी पहाटे 1:30 वाजून मिनिटांनी भूकंपाचा झटका जाणवला. त्‍यामुळे नागरिक घाबरून घराबाहेर आले. त्‍याची तीव्रता 4.6 रॅक्‍टर एवढी तर केंद्र राजधानी काठमांडूपासून 75 किलोमीटर अंतरावर असलेल्‍या सिंधुपाल चौक जिल्‍ह्यात असल्‍याचे नेपाळच्‍या आपत्‍ती व्‍यवस्‍थान विभागाने सांगितले. त्‍यानंतर सकाळी 10:07 वाजता दुसरा झटका जाणवला. त्‍याची तीव्रता 4.2 आणि केंद्र धांडिंग जिल्‍ह्यात होते. धांडिंग राजधानी काठमांडूपासून 60 किलोमीटर अंतरावर आहे. एप्रिलमध्‍ये झालेल्‍या मोठ्या भूकंपानंतर नेपाळमध्‍ये 342 झटके बसले.