फ्लोरिडा- एकाच रुग्णालयात कामाला, एकाच मजल्यावर काम करतानाही परस्परांपासून अनभिज्ञ असलेल्या दोन बहिणींचे मिलन केवळ योगायोगानेच झाले. हॉली ओ ब्रायन मेगन ह्यूज या दोघी सख्ख्या बहिणी. दशकभरापूर्वी त्यांची दक्षिण कोरियात ताटातूट झाली. दोघीही अनाथ असल्याने अमेरिकेतील दोन कुटुंबांनी त्यांना दत्तक घेतले.
दत्तक जाताना हॉली वर्षांची होती. ट्रेनखाली आल्याने तिच्या पित्याचा मृत्यू झाला होता. तिची रवानगी अनाथ आश्रमात झाली. छोटी बहीण मेगनला तिची सावत्र आई सोबत घेऊन गेली होती.
आपली लहान बहीण कुठे आहे याची खबर हॉलीला नव्हती. हॉली आपल्या नव्या कुटुंबीयांसह खुश होती. तिला एका रात्री अचानक बहिणीच्या आठवणीने जाग आली ती भावुक झाली. आपल्या बहिणीचा शोध घेण्याची तिने विनंती केली. अनाथ आश्रमाशी संपर्क साधल्यानंतर मेगनचा रेकॉर्ड मिळाला नाही. हॉलीला बहीण भेटेलच असा विश्वास होता. मेगनचे नावही बदलले होते. उन सूक शिन नावाने ती परिचित झाली.
तिला किंग्जस्टनच्या एका कुटुंबाने दत्तक घेतले. व्हर्जिनियात राहणाऱ्या हॉलीपासून ती ३०० मैल दूर होती. या वर्षी हॉलीने फ्लोरिडातील बेफ्रंट रुग्णालयाच्या सर्जिकल विभागात काम सुरू केले. तीन महिन्यांनंतर मेगन याच रुग्णालयात फिजिकल थेरपी असिस्टंट म्हणून काम करू लागली. एका रुग्णाच्या माध्यमातून दोघींचा संवाद सुरू झाला. तुम्ही दोघी मूळच्या एकाच ठिकाणच्या असल्याने तुम्ही प्रत्यक्ष भेटावे, असे रुग्णानेच सुचवले. दोघींमध्ये संवाद सुरू झाला तेव्हा अनेक सवयींत साम्य आढळले.
पुढील स्लाइड्सवर पाहा दोन्ही बहिणींचे फोटो..